अ‍ॅपशहर

website hack: संरक्षण खात्याची वेबसाइट हॅक

संरक्षण मंत्रालयाची वेबसाइट हॅक करण्यात आली आहे. या वेबसाइटवर चीनी लिपीतील अक्षरे दिसत आहे. त्यामुळे ही वेबसाइट चीनने हॅक केल्याची शक्यता बळावली असून या प्रकरणाची चौकशीही सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Apr 2018, 9:42 am
नवी दिल्ली: संरक्षण मंत्रालयाची वेबसाइट हॅक करण्यात आली आहे. या वेबसाइटवर चीनी लिपीतील अक्षरे दिसत आहे. त्यामुळे ही वेबसाइट चीनने हॅक केल्याची शक्यता बळावली असून या प्रकरणाची चौकशीही सुरू करण्यात आली आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ministry of defence website hacked chinese characters appearing on the website home page
website hack: संरक्षण खात्याची वेबसाइट हॅक


संरक्षण मंत्रालयाची https://mod.gov.in ही वेबसाइट आज सायंकाळी ४.३० वाजता हॅक झाली. वेबसाइटच्या होमपेजवर 'मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स' ही अक्षरे इंग्रजीत आणि 'रक्षा मंत्रालय' ही अक्षरे हिंदीत दिसत आहेत. पेज ओपन केल्यावर त्यावर 'एरर' दाखवत असून चिनी लिपीतील अक्षरेही दिसत आहेत. त्यामुळे चीनने हे संकेतस्थळ हॅक केले की अन्य कुणी? याबाबत तर्क-वितर्क लढवले जात आहेत. मात्र या प्रकाराला कोण जबाबदार आहे, याबाबत काहीही माहिती देण्यात आलेली नाही.

दरम्यान, संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून याप्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. 'संरक्षण मंत्रालयाने तातडीने चौकशी सुरू केली आहे. लवकरच संकेतस्थळ पूर्ववत होईल. भविष्यात अशा घटना घडू नये म्हणून पावले उचलले जातील,' असं ट्विट सीतारामन यांनी केलं आहे.दरम्यान, संरक्षण मंत्रालयाची वेबसाइट हॅक करण्यामागे चीनी हॅकर्स असल्याचं बोललं जातंय. त्या दिशेनेही संरक्षण मंत्रालयाने तपास सुरू केला आहे.

हार्डवेअर फेल झाल्याने...

दरम्यान, हार्डवेअर फेल झाल्यामुळे संरक्षण मंत्रालयाच्या साइटसह प्रशासनाच्या विविध खात्याच्या साइटस ठप्प झाल्या होत्या, असं सरकारकडून उशिरा सांगण्यात आलं. त्यामुळे चिनी हॅकर्सने या साइट हॅक केल्या नसल्याचं स्पष्ट झालं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज