अ‍ॅपशहर

अंतराळात जाणाऱ्या गगनयात्रींसाठी मेन्यू तयार

गगयान मोहिमेअंतर्गत अंतराळाची सफर करणाऱ्या अवकाशवीरांसाठी विशेष खाद्य पदार्थ तयार करण्यात आले आहेत. मैसूर स्थित संरक्षण दलाच्या संशोधन प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी विशेष प्रक्रिया केलेले खाद्य पदार्थ या मोहिमेसाठी जाणाऱ्यांसाठी तयार केले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Jan 2020, 5:35 pm
नवी दिल्लीः भारतासाठी महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या गगनयान मोहिमेची तयारी सुरू झाली आहे. गगनयान मोहिमेवर जाण्यासाठी भारतीय हवाई दलातील चार वैमानिकांची निवड पूर्ण झाली असून, विशेष प्रशिक्षणासाठी ते लवकरच रशियाला जाणार आहेत. गगयान मोहिमेअंतर्गत अंतराळाची सफर करणाऱ्या अवकाशवीरांसाठी विशेष खाद्य पदार्थ तयार करण्यात आले आहेत. मैसूर स्थित संरक्षण दलाच्या संशोधन प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी विशेष प्रक्रिया केलेले खाद्य पदार्थ या मोहिमेसाठी जाणाऱ्यांसाठी तयार केले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mission gaganyaan food menu ready for gagannauts
अंतराळात जाणाऱ्या गगनयात्रींसाठी मेन्यू तयार


गगनयानात बसून अंतराळात जाणाऱ्या अवकाशवीरांसाठी कोणकोणते खाद्य पदार्थ दिले जाणार आहेत, याबद्दलची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अंतराळ मोहिमेवर जाणाऱ्या गगनयात्रींना एग रोल्स, व्हेज रोल्स, इडली, मूगाच्या डाळीचा हलवा आणि व्हेज पुलाव, असे खाद्य पदार्थ दिले जाणार आहेत. याचप्रमाणे ज्यूस आणि पाणीही सोबत दिले जाणार आहे.


गगनयानात खाद्य पदार्थ गरम करण्यासाठी विशेष सुविधा देण्यात येणार आहे. अंतराळात गेल्यावर पृथ्वीवरील गुरुत्वाकर्षण क्षीण होत जाते. यासाठी गगनयानासाठी विशेष भांडी तयार करण्यात आली असून, यामध्ये अवकाशवीर आपले खाद्य पदार्थ ठेवू शकतील.

चांद्रयान-३: मोहिमेसाठी ६०० कोटी ₹ खर्च येणार

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०१८ रोजी लाल किल्ल्यावरील भाषणादरम्यान गगनयान मोहिमेची घोषणा केली होती. २०२२ मध्ये भारतीय अंतराळात जातील, असेही पंतप्रधानांनी सांगितले होते. या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) अथक प्रयत्न करीत आहे.

इस्रोचे व्हिजन २०२०

गनयान मोहिमेची तयारी सुरळीत सुरू असून, विविध यंत्रणांच्या चाचण्या घेतल्या जात आहेत. मोहिमेसाठी निवडलेल्या दहा अवकाशवीरांमधून चार अंतिम अवकाशवीरांची निवड निश्चित झाली आहे. जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात त्यांना प्रशिक्षणासाठी रशियात पाठवण्यात येणार आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत मानवरहित गगनयानाची पहिली चाचणी घेण्यात येईल, अशी माहिती इस्रोचे अध्यक्ष डॉ. के. सिवन यांनी दिली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज