अ‍ॅपशहर

काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी यशोमती ठाकूर

काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षांतर्गत साफसफाई सुरू केली असून पक्षात अधिकाधिक तरूण चेहऱ्यांना संधी द्यायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील आमदार यशोमती ठाकूर यांना अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिवपदावर नियुक्त करण्यात आले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 31 Mar 2018, 5:41 pm
नवी दिल्ली: काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी पक्षांतर्गत साफसफाई सुरू केली असून पक्षात अधिकाधिक तरूण चेहऱ्यांना संधी द्यायला सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील आमदार यशोमती ठाकूर यांना अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सचिवपदावर नियुक्त करण्यात आले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम mla yashomati thakur elected as a secretary of aicc
काँग्रेसच्या राष्ट्रीय सचिवपदी यशोमती ठाकूर


राहुल गांधी यांनी कालच पक्षातील तरूण खासदार राजीव सातव यांची गुजरात काँग्रेसच्या प्रभारीपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर आज यशोमती ठाकूर यांना थेट राष्ट्रीय कार्यकारिणीतच घेण्यात आले आहे. ठाकूर या अमरावतीतील तिवसा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार आहेत. पेशाने वकील असणाऱ्या ठाकूर या अभ्यासू आमदार म्हणून ओळखल्या जातात. महाराष्ट्र विधानसभेतही त्यांनी वेगळी छाप सोडली आहे. त्यांच्या निवडीमुळे अमरावतीत जल्लोष करण्यात येत आहे. आगामी काळात यशोमती ठाकूर यांच्याकडील जबाबदाऱ्या वाढणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज