श्रीनगर : काश्मीरमध्ये गुरुवारी मोबाइल इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली. फुटीरतावादी नेता सईद अली शाह गिलानी यांच्या प्रकृतीविषयी कुठल्याही प्रकारच्या अफवा पसरू नयेत, यासाठी मोबाइल इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. त्यांच्या प्रकृतीसंदर्भात सोशल मीडियावर बुधवारी काही पोस्ट पडल्यानंतर इंटरनेट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, काश्मीरमध्ये संवेदनशील भागांमध्ये सुरक्षाव्यवस्था कडक करण्यात आली आहे.
मोबाइल इंटरनेट पूर्ववत
काश्मीरमध्ये गुरुवारी मोबाइल इंटरनेट सेवा पूर्ववत करण्यात आली...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 14 Feb 2020, 1:42 pm