नवी दिल्ली : ‘दहशतवादावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगाला नोटाबंदीचा मार्ग दाखविला आहे. त्यासाठी आता सशस्त्र दलाची आवश्यकता नाही. मोदींनी दाखविलेल्या मार्गानुसार दहशतग्रस्त देशांनीही नोटाबंदी करून दहशतवाद संपवावा, अशी उपरोधिक टीका गुरुवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. आणखी वीस दिवस प्रतीक्षा करा, ‘अच्छे दिन’ येणार आहेत, असा टोलाही त्यांनी लगावला. शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार राजकुमार धूत यांच्या कन्येच्या विवाह समारंभाला उपस्थित राहण्यासाठी ते दिल्लीत आले होते.
‘जगाने मोदींचा आदर्श घ्यावा’ : उद्धव ठाकरे
‘दहशतवादावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगाला नोटाबंदीचा मार्ग दाखविला आहे. त्यासाठी आता सशस्त्र दलाची आवश्यकता नाही. मोदींनी दाखविलेल्या मार्गानुसार दहशतग्रस्त देशांनीही नोटाबंदी करून दहशतवाद संपवावा, अशी उपरोधिक टीका गुरुवारी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.
Maharashtra Times 9 Dec 2016, 4:18 am