अ‍ॅपशहर

नरेंद्र मोदी 'असाही' विक्रम करणार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना होणार असून डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. या भेटीदरम्यान मोदी हे ट्रम्प यांच्यासोबत व्हाइट हाऊसमध्ये डिनर करणार आहेत. व्हाइट हाउसमध्ये 'डिनर'चा मान मिळणारे मोदी हे पहिले विदेशी नेते ठरणार आहेत.

Maharashtra Times 24 Jun 2017, 12:56 pm
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम modi will be first foreign leader to have white house dinner with trump
नरेंद्र मोदी 'असाही' विक्रम करणार!

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना होणार असून डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर मोदींचा हा पहिलाच दौरा आहे. या भेटीदरम्यान मोदी हे ट्रम्प यांच्यासोबत व्हाइट हाऊसमध्ये डिनर करणार आहेत. व्हाइट हाउसमध्ये 'डिनर'चा मान मिळणारे मोदी हे पहिले विदेशी नेते ठरणार आहेत.

पॅरिस करारावरून भारतावर केलेली टीका, एच१बी व्हिसा धोरण तसेच पाकिस्तानच्या वाढत्या कारवाया या सर्व पार्श्वभूमीवर मोदी-ट्रम्प यांची भेट होत आहे. २६ जून रोजी मोदी व ट्रम्प यांची भेटणार असून दुपारच्या सुमारास ते एकमेकांशी चर्चा करतील. वाढत्या दहशतवादाशी लढा देणे, भारताच्या संरक्षण क्षेत्रातील आधुनिकीकरणासाठी मदत आणि एशिया-पॅसिफिकमध्ये भारताची भूमिका वाढवणे असा अनेक मुद्यांवर दोन्ही नेत्यांदरम्यान चर्चा होईल.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज