अ‍ॅपशहर

'हे' माकड चोरून पिते पेट्रोल!

माकडांच्या लीला सर्वांनाच ठाऊक आहेत. खाण्यापिण्याच्या वस्तू ही माकडं पळवतात हे काही नवे नाही. पण एक असं माकड आहे जे चक्क पेट्रोल पितं! त्याला पेट्रोल प्यायला आवडतं. पण पेट्रोल पंपावर तर ते मिळणार नाही. मग हा पठ्ठ्या टूव्हीलर्सचे पेट्रोल चोरून पितो.

Maharashtra Times 9 Nov 2017, 9:19 am
एसपी रावत, पानीपत
महाराष्ट्र टाइम्स.कॉम monkey who drinks petrol in panipat
'हे' माकड चोरून पिते पेट्रोल!


माकडांच्या लीला सर्वांनाच ठाऊक आहेत. खाण्यापिण्याच्या वस्तू ही माकडं पळवतात हे काही नवे नाही. पण एक असं माकड आहे जे चक्क पेट्रोल पितं! त्याला पेट्रोल प्यायला आवडतं. पण पेट्रोल पंपावर तर ते मिळणार नाही. मग हा पठ्ठ्या टूव्हीलर्सचे पेट्रोल चोरून पितो.

पानीपत शहराच्या इंसार बाजारात एका माकडामुळे दुकानदार आणि ग्राहकही त्रस्त आहेत. बाजारात उभ्या असलेल्या बाईकत्चा इंजिनजवळचा पेट्रोलचा पाईप ओढून हे माकड पेट्रोल पिते. बाईक सुरू केल्यावर लक्षात येतं की पेट्रोल गायब आहे. एकतर पेट्रोलचे भाव वाढतच चाललेत त्यामुळे माकड पेट्रोल पितंय याचं कौतुक वाटलं असलं तरी ते कौतुक परवडणारं नाही. त्यामुळे या माकडाला लोक पिटाळून लावतात. पण संधी साधून ते पेट्रोलवर धाड मारतंच.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज