अ‍ॅपशहर

मान्सूनची केरळात दस्तक

असह्य उकाड्याने सगळेच हैराण झालेले असताना केरळच्या काही भागांत मान्सूनचे आगमन झाल्याची आनंददायी बातमी येऊन थडकली आहे. मान्सून आज केरळात दाखल झाल्याचा दावा हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या स्कायमेट या खासगी कंपनीने केला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने मात्र पुढील २४ तासांत मान्सूनचे केरळात आगमन होईल, असे आज सकाळी सव्वाआठ वाजता जारी केलेल्या बुलेटिनमध्ये म्हटले होते.

Maharashtra Times 29 May 2018, 6:51 am
नवी दिल्ली : असह्य उकाड्याने सगळेच हैराण झालेले असताना केरळच्या काही भागांत मान्सूनचे आगमन झाल्याची आनंददायी बातमी येऊन थडकली आहे. मान्सून आज केरळात दाखल झाल्याचा दावा हवामानाचा अंदाज वर्तविणाऱ्या स्कायमेट या खासगी कंपनीने केला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने मात्र पुढील २४ तासांत मान्सूनचे केरळात आगमन होईल, असे आज सकाळी सव्वाआठ वाजता जारी केलेल्या बुलेटिनमध्ये म्हटले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम monsoon hits kerala announces skymet
मान्सूनची केरळात दस्तक


केरळमध्ये मान्सूनसारखी स्थिती असून यंदाचा पावसाळा सुरू झाला आहे, असे म्हणायला काहीच हरकत नाही, असे स्कायमेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी जतिन सिंह म्हणाले. हवामान विभागाचे अतिरिक्त महासंचालक मृत्युंजय महापात्रा यांनी मात्र पुढील २४ तासांत मान्सून केरळात दाखल होईल, असे सांगितले आहे. १० मे नंतर केरळमधील १४ वेधशाळांच्या क्षेत्रांपैकी ६० टक्के क्षेत्रात सलग दोन दिवस २.५ मिलीमीटर इतका पाऊस पडल्यास मान्सूनच्या आगमनाची घोषणा केली जाते, असेही ते म्हणाले.

दरम्यान, केरळच्या विविध भागात आज पावसाच्या सरी कोसळल्या. महाराष्ट्राच्या कोकण किनारपट्टी भागातही विविध ठिकाणी गडगडाटासह पावसाने हजेरी लावली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज