अ‍ॅपशहर

देशात ३ लाखांहून अधिक आधार कार्ड बनावट?

देशभरात तीन लाखांहून अधिक आधार कार्ड बनावट पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. बोगस आधार कार्डांसंदर्भात १० जणांना अटक करण्यात आली. या अटकसत्रातून अनेक महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांसमोर आली आहे. नोंदणी कंपन्यांनी कमिशनसाठी देशाच्या सुरक्षेचाच सौदा केला आहे.

Maharashtra Times 11 Sep 2017, 12:20 pm
मटा ऑनलाइन वृत्त । लखनऊ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम more than three lakhs of bases are prepared in a fake manner
देशात ३ लाखांहून अधिक आधार कार्ड बनावट?


देशभरात तीन लाखांहून अधिक आधार कार्ड बनावट पद्धतीने तयार करण्यात आले आहेत. बोगस आधार कार्डांसंदर्भात १० जणांना अटक करण्यात आली. या अटकसत्रातून अनेक महत्त्वपूर्ण माहिती पोलिसांसमोर आली आहे. नोंदणी कंपन्यांनी कमिशनसाठी देशाच्या सुरक्षेचाच सौदा केला आहे.

विशेष तपास पथकाच्या (STF) चौकशीत हे पुढे आलंय की मध्य प्रदेशातल्या एका नोंदणी कंपनीच्या लखनऊमधील अधिकाऱ्यांनी या अटक केलेल्या चोरांना सिस्टीम हॅक करण्याचं सॉफ्टवेअर अॅप्लिकेशन दिलं. हे अॅप्लिकेशन अन्य ऑपरेटर्सना ५-५ हजार रुपयांत विकलं जात आहे. STF ने मिळवलेल्या माहितीनुसार, नोंदणी कंपनीने जूनपूर्वीच अधिकाधिक आधार कार्डं बनवून कमिशनसाठी आधार कार्ड बनवणारी यंत्रं आणि सिस्टीम हॅक करणारं सॉफ्टवेअर बोगस कार्ड बनवणाऱ्यांना दिली. आधी हे लोक टॅम्पर्ड क्लाइंट अॅप्लिकेशनच्या आधारावर बेकायदेशीररीत्या आधार बनवायचे. UIDAI ला जेव्हा या रॅकेटची माहिती कळली तेव्हा त्यांनी नवं सॉफ्टवेअर तयार केलं. हे नवं सॉफ्टवेअर हॅक करण्याचं अॅप्लिकेशन या लखनऊच्या अधिकाऱ्याने या रॅकेटला दिलं.

आधार मोफत असूनही नोंदणी केंद्रं आकारतात पैसे

आधार कार्ड बनवण्यासाठी कोणताही आकार घेतला जात नाही. पण काही नोंदणीकृत कंपन्या यासाठीही लोकांकडून पैसे आकारतात.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज