अ‍ॅपशहर

उघड्यावर शौचास बसाल तर होईल 'ही'कारवाई

आजही देशाच्या ग्रामीण भागातील निम्म्याहून अधिक लोक उघड्यावर शौचाला जातात आणि दुर्गंधी व रोगराई पसरवतात. छत्तीसगड,मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात या राज्यांनी लोकांना उघड्यावर शौचास जाण्यापासून रोखण्यासाठी नामी शक्कल लढवण्यात येत आहे. छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आगळ्यावेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जात आहे. उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांना शिक्षा म्हणून बेवारस जनावरांच्या गाडीत घालून शहरापासून नऊ किलो मीटर लांब सोडण्यात येत आहे.

Maharashtra Times 17 Sep 2017, 3:37 pm
मटा ऑनलाइन वृत्त । बिलासपूर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम municipal corporation has invented a strange way to stop the open defecation
उघड्यावर शौचास बसाल तर होईल 'ही'कारवाई

आजही देशाच्या ग्रामीण भागातील निम्म्याहून अधिक लोक उघड्यावर शौचाला जातात आणि दुर्गंधी व रोगराई पसरवतात. छत्तीसगड,मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात या राज्यांनी लोकांना उघड्यावर शौचास जाण्यापासून रोखण्यासाठी नामी शक्कल लढवण्यात येत आहे. छत्तीसगडमधील बिलासपूरमध्ये उघड्यावर शौचास बसणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आगळ्यावेगळ्या पद्धतीचा अवलंब केला जात आहे. उघड्यावर शौचाला बसणाऱ्यांना शिक्षा म्हणून बेवारस जनावरांच्या गाडीत घालून शहरापासून नऊ किलो मीटर लांब सोडण्यात येत आहे.

सध्या सुरू असलेल्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत आपलं शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी बिलासपूर येथील महानगरपालिकेच्या अधिकारी ही पद्धतीचा वापर करत आहेत. या अधिकाऱ्यांनी शनिवारी उघड्यावर शौचाला बसलेल्या तब्बल २८ लोकांना जनावरांच्या गाडीत बसवून शहरापासून लांब सोडलं.याच प्रमाणे उघड्यावर शौचाला बसलेल्या अनेक लोकांकडून आर्थिक दंड वसूल करण्यात आला आहे. यात तीन महिलांचा समावेश असून त्या दंड भरण्यास असमर्थ असल्यानं त्यांना पोलिसांसमोर हजर केले.

अनेक लोकांनी ही कारवाई करण्याची पद्धत अमानवीय असल्याचं मत व्यक्त केलं आहे. नुकत्याच झालेल्या स्वच्छ भारत सर्वेक्षणात छत्तीसगडमधील बिलासपूर हे अस्वच्छ शहरांपैकी एक असल्याचं समोर आलं होतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज