अ‍ॅपशहर

मुस्लिम मुलीनं भजन गायलं आणि...

एका २२ वर्षीय मुस्लिम मुलीने कन्नड टीव्ही वाहिनीवरील एका रिअॅलिटी शोमध्ये हिंदू भक्तिगीत सादर केले. सुहाना सय्यद असे या मुलीचे नाव असून तिने हिंदू भक्तिगीत सादर केल्यानंतर बंगळुरुच्याच एका कट्टरपंथी 'मँगलोर मुस्लिम्स' नावाच्या ग्रुपने फेसबुकवरून सुहानाची खिल्ली उडविणारी पोस्ट टाकली होती.

Maharashtra Times 9 Mar 2017, 2:24 pm
मटा ऑनलाइन वृत्त। बंगळुरु
महाराष्ट्र टाइम्स.कॉम muslim girl sings bhajan in show trolled
मुस्लिम मुलीनं भजन गायलं आणि...


एका २२ वर्षीय मुस्लिम मुलीने कन्नड टीव्ही वाहिनीवरील एका रिअॅलिटी शोमध्ये हिंदू भक्तिगीत सादर केले. विशेष म्हणजे ती भक्तिगीत गाताना अतिशय सहजपणे आणि मजा घेत गात होती.

सुहाना सय्यद असे या मुलीचे नाव असून तिने हिंदू भक्तिगीत सादर केल्यानंतर बंगळुरुच्याच एका कट्टरपंथी 'मँगलोर मुस्लिम्स' नावाच्या ग्रुपने फेसबुकवरून सुहानाची खिल्ली उडविणारी पोस्ट करत रिअॅलिटी शोमध्ये भाग घेण्यावरून ग्रुपवर प्रतिक्रिया मागविल्या होत्या.

ग्रुपवर पोस्ट पडताक्षणीच प्रतिक्रिया यायला सुरूवात झाली. त्यातील एकाने दिलेली प्रतिक्रिया अशी होती की, 'जर या मुलीने गाणे चुकीचे आहे, तर मग चित्रपटात काम करणाऱ्या अनेक मुस्लिमांचे अभिनय करणे देखील चुकीचे आहे. आधी त्यांना विरोध करा आणि मगच या मुलीविषयी बोला.'

त्या पोस्टवर दर तासाला चांगल्या-वाईट कमेंट्स मिळत होत्या. ग्रुपच्या संकुचित विचारांना छेद देणाऱ्या कमेंट्स पाहता अखेर 'मँगलोर मुस्लिम्स' ग्रुपने ती कमेंट्सच पेजवरून डिलीट केली. बंगळुरुपासून साधारण ३६० किमी अंतरावर असलेल्या शिवमोग्गा जिल्ह्यातील सागर तालुक्यात सुहाना जेव्हा रिअॅलिटी शोमध्ये हिजाब घालून स्टेजवर आली तेव्हा तिच्या प्रयत्नांचे परिक्षकांनी कौतुकच केले. ती गायला लागली तेव्हा मात्र तिच्या गाण्याने परिक्षकांना चांगलीच भुरळ घातली. सुहानाचे हे गाणे म्हणजे 'हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक' असल्याचेही ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज