अ‍ॅपशहर

...तर हिंदू धर्म स्वीकारेन; महिलेची धमकी

सासरच्या मंडळींनी घरात शिरू दिले नाही म्हणून एका मुस्लिम महिलेने हिंदू धर्म स्वीकारण्याची धमकी दिली. बुलंदशहर भागात राहणाऱ्या या महिलेचे नाव रिहाना (३०) आहे.

Maharashtra Times 13 Apr 2017, 2:43 pm
मटा ऑनलाइन वृत्त । अलीगढ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम muslim woman threaten to accept hinduism
...तर हिंदू धर्म स्वीकारेन; महिलेची धमकी


सासरच्या मंडळींनी घरात शिरू दिले नाही म्हणून एका मुस्लिम महिलेने हिंदू धर्म स्वीकारण्याची धमकी दिली. बुलंदशहर भागात राहणाऱ्या या महिलेचे नाव रिहाना (३०) आहे.

रिहानाचा निकाह २०१२ मध्ये जमालपूरमधील मोहम्मद शरीफ याच्याशी झाला होता. पतीशी भांडण झाल्यावर काही महिन्यांपूर्वी ती आपल्या चार वर्षांच्या मुलीला घेऊन आई-वडीलांच्या घरी गेली. मंगळवारी ती सासरी परतली तेव्ही सासरच्या मंडळींनी तिला घरात घुसू दिले नाही. तेव्हापासून तिने घराच्या दरवाजासमोर ठिय्या मारला आहे. बुधवारी हिंदू महासभेचे स्थानिक नेते या महिलेच्या मदतीसाठी जमालपूर येथे आले. यामुळे परिसरात तणाव वाढला. अर्थात हे तीन तलाकचे प्रकरण नसल्याचे या महिलेने स्पष्ट केले आहे.

१८ महिने का? आताच संपवा...

दरम्यान, तोंडी तलाक दीड वर्षात बंद होईल, या ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाच्या घोषणेचे भारतीय मुस्लिम महिला आंदोलन संघटनेने स्वागत केले आहे. त्याचवेळी असा प्रश्नही उपस्थित केला आहे की तोंडी तलाक बंद करण्यासाठी १८ महिने कशाला हवेत. उलेमा ही घोषणा आता का करत नाहीत?

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज