अ‍ॅपशहर

बायकोला माहेरी सोडून नवरा घरी परतला; पोटदुखीमुळे रुग्णालय गाठलं; एक्सरे पाहून डॉक्टर हैराण

बायकोला माहेरी सोडण्यासाठी गेलेल्या तरुणाला जबर मारहाण झाली. सासरच्या मंडळींनी त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहाण केली. सासुरवाडीतून परतलेल्या जावयाच्या पोटात दुखू लागलं. त्यानं हॉस्पिटल गाठलं. त्यावेळी डॉक्टरांना त्याच्या आतड्या आणि गुदद्वाराच्या दरम्यान ग्लास आढळला.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 21 Jan 2023, 12:49 pm
मुझफ्फरपूर: बिहारच्या मुझफ्फरपूर एका व्यक्तीला सासुरवाडीत जाणं महागात पडलं. पत्नीला माहेरी सोडण्यासाठी गेलेल्या पतीला सासरच्या लोकांनी जबर मारहाण केली. बेदम मारहाणीमुळे पती बेशुद्ध पडला. त्यानंतर सासरच्या लोकांनी जावयाच्या गुप्तांगात ग्लास टाकला. त्यावेळी तरुण बेशुद्ध पडला असल्यानं तरुणाला त्याच्यासोबत नेमकं काय झालं आहे ते समजलं नाही. पोटात दुखू लागल्यानं आणि वेदना वाढत गेल्यानं पीडित तरुण डॉक्टरांकडे गेला. डॉक्टरांनी त्याच्या पोटाचा एक्सरे काढला. त्यावेळी त्यांना तरुणाच्या पोटात ग्लास दिसला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम private glass


पीडित तरुण साहेबगंजच्या रामपूरचा रहिवासी आहे. पीडित तरुणासोबत १५ दिवसांपूर्वी हा प्रकार घडला. दोन आठवड्यांपूर्वी तरुण त्याच्या पत्नीला माहेरी सोडण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याचा मेहुण्याशी आणि कुटुंबातील इतरांशी वाद झाला. सासरच्या लोकांनी तरुणाला बेदम मारहाण केली. तरुण बेशुद्ध पडला. त्यानंतर सासरच्या माणसांनी त्याच्या गुप्तांगात संपूर्ण ग्लास टाकला. शुद्ध आल्यानंतर तरुण आपल्या गावी परतला.
घंटा वाजली, शाळा भरली; वर्गात जाताच मुलींची किंकाळी; मुख्याध्यापकांना पाहून अंगावर काटा
गावी परतल्यानंतर तरुणाच्या पोटात दुखू लागलं. वेदना वाढू लागल्यानं त्यानं गुरुवारी एसकेएमसीएच रुग्णालय गाठलं. तिथे डॉक्टरांनी त्याच्या पोटाचा एक्सरे गाठला. गुप्तांगात सातत्यानं वेदना होत असल्यानं तरुण सुरुवातीला गावातील वैद्याकडे गेला. त्यांनी तरुणावर उपचार केले. इंजेक्शन दिल्यानंतर वेदना कमी व्हायच्या. मात्र काही वेळात, इंजेक्शनचा प्रभाव कमी झाल्यानंतर पुन्हा त्रास सुरू व्हायचा. त्यामुळे तरुण एसकेएमसीएचला पोहोचला.
तुझी का माझी? बॉयफ्रेंड, एक्स बॉयफ्रेंड एकत्रच घरी; दोघांना पाहताच तरुणीची विहिरीत उडी अन्...
शुक्रवारी तरुणाची प्रकृती आणखी बिघडली. त्यामुळे त्याला एसकेएमसीएचमधून पाटण्याला हलवण्यात आलं. तरुणाच्या आतड्या आणि गुदद्वाराच्या मध्ये ग्लास अडकला होता. हा ग्लास तरुणाच्या गुप्तांगातून आत टाकण्यात आला होता. शस्त्रक्रिया करून ग्लास बाहेर काढण्यात आल्याचं एसकेएमसीएचच्या डॉक्टरांनी सांगितलं.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख