अ‍ॅपशहर

जगातील सर्वात रहस्यमयी घाट; जो इथे जातो तो कधीही परतून येत नाही, भारतातील बर्म्युडा ट्रँगल

Mysterious Places Of India: जगात अनेक अशी रहस्यमी ठिकाणं आहेत ज्याचं गूढ आजवर कोणीही उलगडू शकलेलं नाही. भारतातही अशी अनेक ठिकाणं आहेत, ज्याची कहाणी ऐकून अंगावर काटावर येईल. अशाच एका ठिकाणाबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

Authored byनुपूर उप्पल | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 9 Jun 2023, 6:48 pm

हायलाइट्स:

  • भारतातील बर्म्युडा ट्रँगल माहितीये का
  • या ठिकाणी गेलेली व्यक्ती परत येत नाही
  • भारतातील या रहस्यमयी जागेबद्दल माहितीये का
बातमी थोडक्यात वाचण्यासाठी अॅप डाउनलोड करा
महाराष्ट्र टाइम्स.कॉम Shangri la Valley
इटानगर: बर्म्युडा ट्रँगलबद्दल आपण सर्वांनी ऐकले असेल. एक असं रहस्यमयी ठिकाण जिथे शेकडो जहाजं आणि विमानं बेपत्ता झालेली आहेत. येथे समुद्राच्या पोटात बुडालेल्या शेकडो जहाजांचे अवशेष आहेत. सुमारे १५० वर्षांपासून जहाजे येथे बुडत आहेत आहेत आणि अनेक लोक ही जहाजे पाहण्यासाठी समुद्रात खोलवर जातात. या जागेवरून विमान गेल्यास ते आपोआप खालच्या दिशेने ओढलं जातं आणि समुद्रात पडून बुडतं. पण, तुम्हाला माहित आहे का की भारतातही असं एक ठिकाण आहे, जिथे जर एकदा गेलं तर तेथून परतणे अशक्य आहे.
तिबेट आणि अरुणाचल प्रदेशच्या सीमेवरील 'शांग्री ला व्हॅली' (Shangri La Valley) हे असेच एक ठिकाण आहे. त्याचे गूढ आजपर्यंत कोणालाही कळू शकलेले नाही. असं म्हटले जातं की ते खूप धोकादायक आहे आणि जर कोणीही येथे गेले तर ती व्यक्ती कधीही येथून परत येत नाही.

१२ वीत ९९ टक्के, एक कप चहा अन् तिचं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलं, दिशाची हृदयद्रावक कहाणी
अनेक जण हे ठिकाण दुसऱ्या जगातील असल्याचं सांगतात. तिबेटी साधकही याबद्दल सांगतात. लोककथेत याला अतिशय पवित्र ठिकाण मानलं जातं, परंतु कोणीही येथे जाऊन त्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करत नाही. असं मानले जाते की या ठिकाणी गेल्याने व्यक्ती किंवा वस्तूचे अस्तित्व जगातून नाहीसं होऊन जातं.

प्रसिद्ध तंत्र साहित्य लेखक अरुण कुमार शर्मा यांनीही त्यांच्या 'तिब्बत की वह रहस्यमयी घाटी' या पुस्तकात या ठिकाणाचा तपशीलवार उल्लेख केला आहे. त्यांनी या पुस्तकात असं लिहिलं आहे की, ही अशी जागा आहे की, जिथे चुकूनही जर कोणी गेलं तर त्याला येथून परत येणे अशक्य होतं.


काही जण असंही सांगतात की या ठिकाणी वेळ थांबून जातो. या ठिकाणावरुन कुठला विमानही जाऊ शकत नाही. तिबेटी विद्वान युत्सुंग यांच्या मते, या जागेचा संबंध अवकाशातील दुसऱ्या कुठल्या जगाशी आहे. युत्सुंग स्वतः तिथे गेल्याचा दावाही करतात. त्यांच्या म्हणण्यानुसार, तेथे सूर्यप्रकाश किंवा चंद्रप्रकाश नव्हता. दुधाळ प्रकाश सगळीकडे पसरलेला दिसत होता. तसेच एक विशेष प्रकारची शांतताही तिथे होती, असं त्यांनी सांगितलं. शांग्रीला घाटाला जगातील दुसरा बर्म्युडा ट्रँगल म्हटलं जातं.
लेखकाबद्दल
नुपूर उप्पल
नुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा... आणखी वाचा

महत्वाचे लेख