अ‍ॅपशहर

​नगरोटात ठार झालेले चार दहशतवादी 'इथून' भारतात घुसले!​

सीमेवर तैनात असलेल्या सुरक्षा दलांना मोठं यश आलं आहे. सांबा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर भुयार आढळून आलं आहे. या भुयाराचा वापर दहशतवादी भारतात घुसखोरीसाठी केला जात असल्याचा दाट संशय आहे

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Nov 2020, 7:38 pm
जम्मूः जम्मू आणि काश्मीरच्या सांबा जिल्ह्यातील पाकिस्तानला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेजवळ सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जवानांना भुयार ( bsf found tunnel ) आढळून आले आहे. गस्तीवर असलेल्या बीएसएफच्या जवानांना हे भुयार दिसले. भारतात दहशतवाद्यांच्या घुसखोरीसाठी या भुयाराचा वापर केला जात असल्याची शंका, बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलीय.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम tunnel detected near international border in samba sector
नगरोटात ठार झालेले चार दहशतवादी 'इथून' भारतात घुसले!


जम्मू-श्रीनगर महामार्गालगतच्या नगरोटा टोल नाक्याजवळ काही दिवसांपूर्वी झालेल्या चकमकीत ४ दहशतवादी ठार झाले होते. या दहशतवाद्यांनी सांबा सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवरून भारतात घुसखोरी केली होती, असं सुरक्षा दलांनी सांगितलं. दहशतवादी या भुरातून भारतीय सीमेत घुसले. त्यानंतर त्यांना गाइडने महामार्गापर्यंत नेलं, असं जम्मूतील बीएसएफचे महानिरीक्षक एन. एस. जमवाल यांनी सांगितलं.

शुक्रवारपासून भुयार शोधण्याची मोहीम

शुक्रवारपासून सीमेवर अँटी टनेलिंग ऑपरेशन सुरू असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं. त्याअंतर्गत सीमेवर असे भुयार शोधण्यात येत आहेत. बीएसएफसोबतच भारतीय लष्कराचे जवान आणि पोलिस कर्मचारीही या मोहीमेत सहभागी आहेत.

कारवाईचे सर्व पर्याय खुले, भारताचा पाकिस्तानला गंभीर इशारा

नगरोटात ठार झालेल्या दहशतवाद्यांचा सूत्राधार कळला, निघाला मसूदचा भाऊ

नगरोटात जैशचा सामील नाहीः पाक

जम्मू-काश्मीरमधील स्थानिक निवडणुकांपूर्वी पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद हल्ल्याचा कट रचत असल्याचा भारताचा दावा पाकिस्तानने फेटाळला आहे. दिल्लीतील पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलावून भारताने शनिवारीच खडे बोल सुनावले. पाकिस्तानने इतर देशांवर हल्ल्यांसाठी दहशतवादी संघटना आणि दहशतवाद्यांना आपल्या भूमीवर आश्रय देणं आणि पाठिंबा देण्याचे धोरण सोडावं. तसंच तयार केलेलं दहशतवाद्यांचं जाळं नष्ट करावं, असं भारताने पाकिस्तानला सुनावलं आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज