चेन्नई : राजीव गांधी हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली नलिनी श्रीहरन हिचा महिनाभराचा पॅरोल मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी मंजूर केला. मुलीच्या लग्नासाठी तयारी करावयाची असल्याने प~रोल देण्यात यावा, अशी मागणी करणारी याचिका नलिनीने केली होती. मात्र, पॅरोलवर असताना तिने कोणालाही मुलाखत देऊ नये अथवा कोणत्याही राजकीय व्यक्तीची भेट घेऊ नये, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
नलिनीला पॅरोल
राजीव गांधी हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली नलिनी श्रीहरन हिचा महिनाभराचा पॅरोल मद्रास उच्च न्यायालयाने शुक्रवारी मंजूर केला...
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 6 Jul 2019, 4:00 am