अ‍ॅपशहर

नानाजींनी जेपींचा जीव वाचवला होता: मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकनायक जयप्रकाश नारायण आणि नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. जयप्रकाश नारायण आणि नानाजींसारख्या लोकांनी आपलं आयुष्यच देशासाठी समर्पित केलं. त्याचवेळी राजकारणापासून ते कोसो दूर राहिले, असं मोदी म्हणाले.

Maharashtra Times 11 Oct 2017, 2:08 pm
मटा ऑनलाइन वृत्त | नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम narendra modi shares his thoughts on birth anniversary nanaji deshmukh jayprakash narayan
नानाजींनी जेपींचा जीव वाचवला होता: मोदी


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकनायक जयप्रकाश नारायण आणि नानाजी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली. 'जयप्रकाश नारायण आणि नानाजींसारख्या लोकांनी आपलं जीवन देशासाठी समर्पित केलं. सत्तेच्या प्रलोभनांना बळी न पडता ते राजकारणापासून कोसो दूर राहिले,' असं मोदी म्हणाले. जयप्रकाश आणि नानाजींच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी पाटण्यातील एक प्रसंगही यावेळी सांगितला.

'जयप्रकाश यांनी भ्रष्टाचाराविरोधात लढा पुकारला होता. त्यामुळं दिल्लीतील सत्तेला हादरा बसला होता. त्यांचा हा लढा मोडून काढण्यासाठी अनेक कट रचले गेले. पाटण्यातील एका कार्यक्रमात जेपींवर हल्लाही झाला होता. त्यावेळी नानाजी देशमुख त्यांच्या शेजारीच उभे होते. त्यांनी जेपींवरील प्रहार आपल्या हातावर झेलला आणि त्यांचा जीव वाचवला. यात नानाजींना दुखापत झाली, अशी आठवण मोदींनी सांगितली. यावेळी मोदींनी जेपी आणि नानाजींच्या सामाजिक कार्याचा उल्लेख केला. सत्तेच्या वर्तुळात लोकं आपापली जागा निर्माण करण्यासाठी धडपडत असतात. पण जेपी नेहमीच सत्तेपासून दूर राहिले. तसंच नानाजींना मोरारजी सरकारनं मंत्रिपदाबाबत विचारलं होतं. पण त्यांनी विनम्रतेनं नकार दिला, अशी आठवणही मोदी यांनी सांगितली.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज