अ‍ॅपशहर

navneet rana : महाराष्ट्रातील दंगलींचा मुद्दा संसदेत; नवनीत राणा म्हणाल्या, 'ठाकरे सरकार....'

महाराष्ट्रात गेल्या महिन्यात अमरावतीत दंगल झाली. यावरून महाराष्ट्रात मोठे राजकारण रंगले. आता हा दंगलींचा मुद्दा संसदेत उपस्थित करण्यात आला. अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Dec 2021, 9:22 am
नवी दिल्ली : त्रिपुरात झालेल्या हिंसाचाराचे पडसात महाराष्ट्रात उमटले होते. या प्रकरणावरून महाराष्ट्रात मोठं राजकारण रंगलं. अमरावतीसह महाराष्ट्रात काही ठिकाणी दंगे घडले. आता या मुद्द्यावरून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आघाडी सरकारवर अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात घडलेले दंगे राज्यातील महाविकास आघाडी सरकारने का रोखले नाहीत? आणि सरकारचा या दंगलींना पाठिंबा होता का? असा सवाल करत नवनीत कौर राणा यांनी हल्ला चढवला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम navneet rana targets maharashtra thackeray government over riots in amravati
महाराष्ट्रातील दंगलींचा मुद्दा संसदेत; नवनीत राणा म्हणाल्या, 'ठाकरे सरकारचा....'


काय म्हणाल्या नवनीत कौर राणा?

अमरावतीत १२ नोव्हेंबर २०२१ ला पोलिसांची कुठलीही परवानगी न घेता हजारोंच्या संख्येत मोर्चा काढण्यात आला. काही राजकीय पक्षांनी या मोर्चाला पाठिंबा दिला. पोलिसांनी त्यांना का नाही रोखलं? महाराष्ट्र सरकारने या मोर्चाला पाठिंबा दिला होता? महाराष्ट्र सरकारमधील नेते त्या दिवशी प्रक्षोभक भाषण का देत होते? या मोर्चादरम्यान जमावाने व्यापाऱ्यांच्या दुकानांवर दगडफेक केली. काहींना मारहाण केली. तसंच दुकानांची तोडफोड करण्यात आली. हिंसाचार करण्यासाठी त्यांना कोणी एवढी हिंमत दिली. आणि या सर्व घटनेच्या मागे कोण आहे? या प्रकरणाची कसून चौकशी केली पाहिजे. संपूर्ण घटनेत महाराष्ट्र सरकारचे अपयश दिसून आले. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारच्या ५ वर्षांच्या काळात असे जातीय दंगे कधीच झाले नाहीत. पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाकरे आणि त्यांच्या तीन तिघाडी सरकारमध्ये असे दंगे का झाले? यात ठाकरे सरकारची काय भूमिका होती? या घटनेचा निषेध करते. या प्रकरणी ठोस कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली.

supreme court parambir singh case : ठाकरे सरकारला झटका! परमबीर सिंग प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिले 'हे' आदेश

त्रिपुरामध्ये घडलेली घटनेवरून अमरावतीत अफवा पसरवली गेली. रझा अकादमीने अफवा पसरवण्याचं काम केले. आगीत तेल टाकण्याचं काम केलं. रझा अकादमीच्या केंद्रांवर कारवाई करावी. फक्त अमरावतीत नाही, तर नांदेड, नाशिकच्या मालेगावमध्ये दंगे झाले. असे दंगे करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी अमरावतीच्या खासदार नवनीत कौर राणा यांनी केली.

sanjay raut : राऊतांचा केंद्रावर घणाघात; म्हणाले,'... आम्हाला गोळ्या घातल्या जात नाहीत एवढाचं फरक'

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज