अ‍ॅपशहर

नौदलाकडून ब्राह्मोसची यशस्वी चाचणी

ब्राह्मोस लँड अॅटॅक सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची नौदलाने शुक्रवारी यशस्वी चाचणी केली. त्यामुळे समुद्रातून जमिनीवरील लक्ष्यावर मारा करण्याची क्षमता असलेल्या मोजक्या देशांच्या पंक्तीत आता भारतीय नौदलाला स्थान मिळाले आहे.

Maharashtra Times 21 Apr 2017, 9:41 pm
समुद्रातून जमिनीवर मारा करण्याची क्षमता
महाराष्ट्र टाइम्स.कॉम navy successfully tests land attack brahmos supersonic missile
नौदलाकडून ब्राह्मोसची यशस्वी चाचणी


वृत्तसंस्था, नवी दिल्ली

ब्राह्मोस लँड अॅटॅक सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची नौदलाने शुक्रवारी यशस्वी चाचणी केली. त्यामुळे समुद्रातून जमिनीवरील लक्ष्यावर मारा करण्याची क्षमता असलेल्या मोजक्या देशांच्या पंक्तीत आता भारतीय नौदलाला स्थान मिळाले आहे.

नौदलाच्या तेग या फ्रीगेट नौकेवरून शुक्रवारी हे लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र जमिनीवरील लक्ष्यावर यशस्वीरित्या डागण्यात आले, अशी माहिती नौदलाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. भारत आणि रशियाने संयुक्तरित्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची निर्मिती केली असून या क्षेपणास्त्राची युद्धनौकाविरोधी आवृत्ती याआधीच भारतीय नौदलात दाखल झाली आहे.

‘ब्राह्मोस लँड अॅटॅक सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची ही पहिलीच चाचणी यशस्वी झाल्याने नौदलाचे सामर्थ्य वाढले असून भारताला काही मोजक्या देशांच्या पंक्तीत स्थान मिळाले आहे,’ असे नौदलाचे प्रवक्ते कॅप्टन डी. के. शर्मा यांनी सांगितले. सध्या फक्त अमेरिका, रशिया, ब्रिटन आणि चीन या देशांच्या नौदलांकडे ही क्षमता आहे. भारतीय नौदलातील कोलकाता, रणवीर, तेग वर्गातील युद्धनौकांवरून हे क्षेपणास्त्र डागण्याची क्षमता आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज