नवी दिल्ली: भाजप आणि एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सायंकाळी ७ वाजता राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन सत्ता स्थापण्याचा दावा करणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र भाजप सूत्रांकडून या बातमीला अधिकृत दुजोरा देण्यात आलेला नाही.
राष्ट्रपती कोविंद यांनी आज १६वी लोकसभा भंग केली असून १७ व्या लोकसभेची स्थापना करण्याची तयारी सुरू झाली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील आरोरा यांच्या नेतृत्वाखालील निवडणूक आयोगाच्या तीन सदस्यीय पथकाने राष्ट्रपतींची भेट घेऊन त्यांच्याकडे ५४२ सदस्यांची यादी सुपूर्द केली. १६ व्या लोकसभेचा कार्यकाळ येत्या ३ जून रोजी संपत आहे. तत्पूर्वी मोदींनी शुक्रवारी राष्ट्रपतींना भेटून त्यांच्याकडे मंत्रीमंडळाचा सामूहिक राजीनामा सोपवला होता. दरम्यान, पंतप्रधान मोदी रविवारी गुजरातला जाणार आहेत. तिथे ते त्यांची आई हिराबेन यांचे आशीर्वाद घेतील. त्यानंतर त्यांच्या वाराणासी मतदारसंघात जातील आणि तिथल्या जनतेशी संवाद साधतील.