अ‍ॅपशहर

'नीट'चा निकाल लागला, पण सर्व्हर डाऊन झाल्याने विद्यार्थी वैतागले

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे देशभरातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या 'नीट' या सामाईक परीक्षेचा निकाल आज लागला. मात्र नीटचं संकेतस्थळ ढेपाळल्याने विद्यार्थ्यांना सायंकाळपर्यंत निकाल पाहता आला नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड संताप पसरला होता.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 5 Jun 2019, 5:20 pm
नवी दिल्ली: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे देशभरातील वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राष्ट्रीय पातळीवर घेण्यात येणाऱ्या 'नीट' या सामाईक परीक्षेचा निकाल आज लागला. मात्र नीटचं संकेतस्थळ ढेपाळल्याने विद्यार्थ्यांना सायंकाळपर्यंत निकाल पाहता आला नाही. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये प्रचंड संताप पसरला होता.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम neet


नीटच्या निकालाची विद्यार्थी आणि पालकांमध्ये सकाळपासूनच उत्सुकता होती. त्यामुळे निकाल जाहीर होताच विद्यार्थी आणि पालकांनी संगणक आणि मोबाईल इंटरनेटवरून नीटच्या ntaneet.nic.in या संकेतस्थळावर जाऊन निकाल पाहण्यास सुरुवात केली. पण सर्व्हर डाऊन झाल्याने अनेकांना निकाल पाहता आले नाही. बराच प्रयत्न करूनही नीटचे संकेस्थळ सुरू होतं नव्हतं. अगदी सायंकाळचे पाच वाजले तरी सर्व्हर डाऊनच असल्याने विद्यार्थी आणि पालक प्रचंड वैतागले होते. त्यातच नातेवाईक आणि मित्रमंडळींकडून नीटच्या निकालाबाबत विचारणा होत असल्याने पालक आणि विद्यार्थ्यांना उत्तर देता देता नाकीनऊ आले होते.

२० मे रोजी देशभरात नीट परीक्षा झाली होती. या परीक्षेसाठी एकूण १,५१,९३७५ विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. त्यापैकी १,४१,०७५५ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तर १,०८,६२० विद्यार्थी गैरहजर राहिले होते. तर एकूण ७,९७,०४२ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत क्वालिफाय केलं होतं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज