अ‍ॅपशहर

शाओमीचा Mi 6 Plus उद्या बाजारात?

जबरदस्त फिचर्सने समृद्ध असलेले स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन देणाऱ्या शाओमी कंपनीचा नवा फोन मंगळवारी बाजारात दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे. शाओमीच्या या नव्या फोनची तंत्रप्रेमींना उत्सुकता लागून राहिली आहे. शाओमी कंपनीने लवकरच ६ जीबी इतकी तगडी रॅम असणारा फोन बाजारात दाखल करणार असल्याची कल्पना याआधीच दिली होती.

Maharashtra Times 10 Jul 2017, 3:27 pm
मटा ऑनलाइन वृत्त | नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम new xiaomi phone with 6gb of ram and 4000mah battery launching on july 11
शाओमीचा Mi 6 Plus उद्या बाजारात?

जबरदस्त फिचर्सने समृद्ध असलेले स्वस्त आणि मस्त स्मार्टफोन देणाऱ्या शाओमी कंपनीचा नवा फोन मंगळवारी बाजारात दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे. शाओमीच्या या नव्या फोनची तंत्रप्रेमींना उत्सुकता लागून राहिली आहे. शाओमी कंपनीने लवकरच ६ जीबी इतकी तगडी रॅम असणारा फोन बाजारात दाखल करणार असल्याची कल्पना याआधीच दिली होती.

खरंतर MI चा ६ जीबी रॅम असणारा हा काही पहिला फोन नाही. याआधी शाओमीने Mi 5s Plus, Mi Note 2, Mi MIX आणि Mi 6 या स्मार्टफोन्समध्ये ६ जीबीची रॅम देण्यात आली आहे. तरीही शाओमीकडून केल्या जाणाऱ्या नव्या जाहिरातीवरून नव्या फोनबाबत सर्वांची उत्सुकता शीगेला पोहोचली आहे.

संभाव्य फिचर्स-

>> Mi 6 Plus असं या नव्या फोनचं नाव असणार आहे.
>> ६ जीबीची तगडी रॅम
>> ४००० एमएएच क्षमतेची बॅटरी
>> २२ मेगापिक्सेल्सचा कॅमेरा
>> स्नॅपड्रॅगन ८०० सीरिज प्रोसेसर
>> 3D ग्लास बॉडी
>> झटपट चार्जिंगसाठी USB-C पोर्ट

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज