अ‍ॅपशहर

निर्भया प्रकरण : दोषी पवनची याचिका फेटाळली

पवननं आपल्या अर्जात घटनेवेळी आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. यापूर्वी त्याची रिव्ह्यू याचिकाही सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली होती. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं सर्वसंमतीनं पवन गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका आज फेटाळून लावलीय.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 2 Mar 2020, 11:41 am
नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ता याचि क्युरेटिव्ह पिटिशन सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावलीय. पवननं आपल्या अर्जात घटनेवेळी आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला होता. यापूर्वी त्याची रिव्ह्यू याचिकाही सर्वोच्च न्यायालयानं फेटाळून लावली होती. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठानं सर्वसंमतीनं पवन गुप्ता याची क्युरेटिव्ह याचिका आज फेटाळून लावलीय. ही क्युरेटिव्ह पिटिशन कोर्टानं फेटाळली तरीदेखील दोषी पवनजवळ दया याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध आहे, असं कायदेतज्ज्ञांचं म्हणणं आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरण : पवन गुप्ता


निर्भयाच्या दोषींची जगण्यासाठी धडपड सुरूच

न्यायमूर्ती एन व्ही रमन्ना, न्यायमूर्ती अरुण मिश्रा, न्यायमूर्ती रोहिंग्टन फली नरीमन, न्यायमूर्ती आर भानुमती आणि न्यायमूर्ती अशोक भूषण यांनी हा निर्णय एकमतानं दिलाय. दोषी पवनच्या याचिकेवर सकाळी १०.२५ मिनिटांनी सुनावणी सुरू झाली होती. क्युरेटिव्ह पिटिशनवर सुनावणी बंद दाराआड केली जाते. त्यानुसार ही सुनावणी पार पडली.

उल्लेखनीय म्हणजे, या प्रकरणातील इतर तीन दोषी मुकेश, विनय आणि अक्षय यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह याचिका आणि दया याचिका फेटाळण्यात आल्या आहेत.

निर्भयाच्या चारही दोषींना फासावर लटकावण्यासाठी ३ मार्च ही तारीख निश्चित करण्यात आलीय. कायदेतज्ज्ञ नवीन शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, आज न्यायालयानं पवनची क्युरेटिव्ह पिटिशन फेटाळली गेली तरी त्याच्याकडे दया याचिका दाखल करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. त्याला ही दया याचिकाही ३ मार्चपूर्वी अर्थात आजच दाखल करावी लागेल. कायद्यानुसार, दया याचिका दाखल केलेल्या कोणत्याही दोषीला ती फेटाळण्यात येईपर्यंत फासावर चढवता येत नाही. दया याचिका फेटाळण्यात आल्यानंतर १४ दिवसांनंतर फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी होऊ शकते.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज