अ‍ॅपशहर

निर्भया: दोषींना फाशी देण्यासाठी 'तिहार'मध्ये जल्लादच नाही!

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींच्या फाशीची तारीख कधीही पडू शकते. कारण या फाशीविरोधात दाद मागण्याचे त्यांचे सर्व कायदेशीर प्रयत्न करून झाले आहेत. आता त्यांच्याकडे फार कमी पर्याय आहेत. त्यांना ज्या तिहार तुरुंगात ही फाशी दिली जाईल, त्या तिहार तुरुंगाचं प्रशासन मात्र वेगळ्याच चिंतेत आहे. तुरुंग प्रशासनाकडे निर्भयाच्या दोषींना फासावर चढवण्यासाठी जल्लादच उपलब्ध नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील एक महिन्यात फाशीची तारीख जाहीर होईल, पण फाशी द्यायची कशी या चिंतेत तुरुंग प्रशासन आहे

Rajshekhar Jha | TNN 3 Dec 2019, 12:49 pm
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम nirbhaya2

निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील दोषींच्या फाशीची तारीख कधीही पडू शकते. कारण या फाशीविरोधात दाद मागण्याचे त्यांचे सर्व कायदेशीर प्रयत्न करून झाले आहेत. आता त्यांच्याकडे फार कमी पर्याय आहेत. त्यांना ज्या तिहार तुरुंगात ही फाशी दिली जाईल, त्या तिहार तुरुंगाचं प्रशासन मात्र वेगळ्याच चिंतेत आहे. तुरुंग प्रशासनाकडे निर्भयाच्या दोषींना फासावर चढवण्यासाठी जल्लादच उपलब्ध नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, पुढील एक महिन्यात फाशीची तारीख जाहीर होईल, पण फाशी द्यायची कशी या चिंतेत तुरुंग प्रशासन आहे.

ब्लॅक वॉरंट जारी होताच फाशी होऊ शकते

तिहार तुरुंगाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तुरुंग प्रशासन फाशी देण्यासाठी आवश्यक प्रक्रियेवर काम करत आहे. पुढील महिन्याभरात कधीही फाशीची तारीख येऊ शकते. दोषींना कोर्टाद्वारे ब्लॅक वॉरंट जारी केल्यानंतर कुठल्याही दिवशी या नराधमांना फाशीवर लटकवले जाऊ शकते. राष्ट्रपती जर निर्भया प्रकरणातील या दोषींची दया याचिका फेटाळून लावतील तर त्यानंतर हा ब्लॅक वॉरंट जारी होईल आणि फाशीची तारीख निश्चित होईल.

यापूर्वी अफझल गुरुला दिली होती तिहारमध्ये फाशी


संसदेवरील हल्ल्यातील दोषी अफझल गुरुला तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली होती. अफझलला फाशी देण्यासाठी तुरुंग प्रशासनाने सुरक्षेच्या दृष्टीने खूप दक्षता घेतली होती. अफझलच्या फाशीच्या वेळी तुरुंगातीलच एका कर्मचाऱ्याने फाशीचा खटका ओढण्यासाठी परवानगी दिली होती.



सूत्रांच्या माहितीनुसार, जल्लादांची संख्या कमी असल्याने अधिकाऱ्यांनी अनौपचारिक पद्धतीने दुसऱ्या तुरुंगांशी जल्लादांसंबंधीदेखील चर्चा केली आहे. यासोबतच उत्तर प्रदेशच्या काही गावातच चौकशी केली जात आहे. याच गावांमधून आधी काही जल्लाद तयार झाले होते.

कंत्राटी पद्धतीने जल्लादाची नियुक्ती

सूत्रांच्या माहितीनुसार, सध्याची परिस्थिती पाहता असं म्हटलं जात आहे की तिहार प्रशासनाकडून जल्लाद नियुक्त केला जाणार नाही. कंत्राची पद्धतीने कोणाची तरी नियुक्ती केली जाईल. एका वरिष्ठ तुरुंग अधिकाऱ्याने सांगितलं, 'आपल्या समाजात फाशीची शिक्षा नेहमी दिली जात नाही. दुर्मिळातील दुर्मिळ प्रकरणात ही अत्यंत कठोर शिक्षा होते. अशा परिस्थितीत फुल टाइम जल्लाद ठेवता येऊ शकत नाही. या नोकरीसाठी कोणी सहसा पटकन तयारही होत नाही.'
लेखकाबद्दल
Rajshekhar Jha

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज