अ‍ॅपशहर

sri sri ravi shankar: अयोध्या वादात श्रीश्रींच्या मध्यस्थीला निर्मोही आखाड्याचा विरोध

निर्मोही आखाड्याचे महंत सीताराम दास यांनी अयोध्या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या मध्यस्थांच्या समितीत आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्या नावाला विरोध दर्शवला आहे. मध्यस्थांच्या यादीत घटनात्मक व्यक्तीचेच नाव असावे असे आम्हाला वाटते असे महंत सीताराम दास यांनी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 8 Mar 2019, 4:07 pm
नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम sri-sri-ravi-shankar-mahara


निर्मोही आखाड्याचे महंत सीताराम दास यांनी अयोध्या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या मध्यस्थांच्या समितीत आर्ट ऑफ लिव्हिंगचे संस्थापक श्री श्री रविशंकर यांच्या नावाला विरोध दर्शवला आहे. मध्यस्थांच्या यादीत घटनात्मक व्यक्तीचेच नाव असावे असे आम्हाला वाटते असे महंत सीताराम दास यांनी वृत्तवाहिन्यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

या प्रकरणात कोणत्याही प्रकारचे राजकारण होऊ नये असे आम्हाला वाटते, असे सीताराम दास यांनी म्हटले आहे. यात कुणीही राजकीय व्यक्ती असावी असे आम्हाला वाटत नाही. यावर केवळ कायदेशीर मार्गानेच तोडगा निघावा असे आम्हाला वाटते. यापूर्वीही श्री श्रींनी मध्यस्ती केली होती. त्यावेळी राजकारण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच या समितीत घटनात्मक व्यक्ती असावी, राजकीय नसावी अशी आमची भूमिका आहे. श्री श्री रविशंकर यांनी जर घटनात्मक पद्धतीने या समितीत काम केले तर आमचा आक्षेप नसेल, असेही दास म्हणाले.

ओवेसी यांचाही विरोध

श्री श्री रविशंकर यांच्या नावाला एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवेसी यांनीही विरोध दर्शवला आहे. श्री श्री रविशंकर हे तटस्थ मध्यस्त नाहीत. ते राजकीय पक्षाशी संबंधीत आहेत. मुसलमानांना राम जन्मभूमीवरील आपला दावा सोडला नाही, तर भारताचा सीरिया होईल अशी धमकीही रविशंकर यांनी दिली होती. हे हिंसेचे समर्थन होते. अशा व्यक्तीला समितीत स्थान देता कामा नये, असे म्हणत ओवेसी यांनी श्री श्रींच्या निष्पक्षतेवर शंका उपस्थित केली आहे. मात्र ओवेसी यांनी समिती स्थापण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.

अयोध्या प्रकरणाचा वाद सोडण्यासाठी मध्यस्थाच्या पर्यायाला सुप्रीम कोर्टाने आज मंजूरी देत मध्यस्थांची समिती नियुक्त केली. न्यायमूर्ती खलीफुल्ला यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या या त्रिसदस्यी समितीत श्री श्री रविशंकर आणि ज्येष्ठ वकील आणि मध्यस्थ श्रीराम पंचू यांचा समावेश आहे. श्री श्री रविशंकर यांनी यापूर्वीही मध्यस्थाची भूमिका पार पाडत अयोध्या प्रकरणाचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज