अ‍ॅपशहर

‘सरकारविरुद्ध आरोप नाही’

‘समाजवादी पक्ष आणि काँग्रेस सरकारांची तुलना करता मोदी सरकारविरुद्ध गेल्या अडीच वर्षांत भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही,’ असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी म्हटले आहे.

Maharashtra Times 8 Feb 2017, 10:37 am
मथुराः ‘समाजवादी पक्ष आणि काँग्रेस सरकारांची तुलना करता मोदी सरकारविरुद्ध गेल्या अडीच वर्षांत भ्रष्टाचाराचा एकही आरोप झाला नाही,’ असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी म्हटले आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम no charges against government
‘सरकारविरुद्ध आरोप नाही’


मथुरेतील तरौली गावात ते निवडणूक प्रचारसभेत बोलत होते. ते म्हणाले, ‘राहुल गांधी यांनी निवडणुकीपूर्वी खाट पकडली. त्यानंतर आता ते पंक्चर झालेल्या ‘सायकल’वर बसले आहेत. उत्तर प्रदेशात भाजपची सत्ता आल्यास लहान शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले जाईल आणि कृषी कर्जावरील व्याजही आकारले जाणार नाही.’ नोटाबंदीचा उल्लेख करून राजनाथसिंह म्हणाले, ‘देशहितातून नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरिब आणि श्रीमंत यांच्यातील दरी कमी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. नोटाबंदीमुळे दहशतवादी आणि नक्षलवाद्यांचे कंबरडे मोडले आहे.’ उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्था कोलमडली असल्याचा आरोप करून राजनाथसिंह म्हणाले, ‘राज्यात लुटमारीच्या चार हजार आणि सात हजार ६०० दंगली झाल्या आहेत.’

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज