अ‍ॅपशहर

coronavirus vaccine : मुंबईत लसीचा साठा ३ दिवसांचा, तर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा 'हा' दावा

करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. यावेळी हर्षवर्धन यांनी परिस्थितीचा आढावा घेत करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सूचना केल्या.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 7 Apr 2021, 2:49 am
नवी दिल्लीः देशात कुठल्याही ठिकाणी करोनावरील लसीचा तुटवडा ( coronavirus vaccine ) नाही, असं केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. सर्व राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना लसींचा आवश्यक पुरवठा केला जात ( no covid-19 vaccine shortage ) आहे. देशात कुठेही लसींचा तुटवडा नाही, असं असं आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी स्पष्ट केलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम harsh vardhan
मुंबईत लसीचा साठा ३ दिवसांचा, तर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांचा 'हा' दावा


देशात करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरही त्यांनी उत्तर दिलं. देशातील करोनाने निर्माण झालेली स्थिती अजूनही नियंत्रणात आहे. पण नागरिकांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे, असं ते म्हणाले.

coronavirus india : करोनावर सरकारचा इशारा, 'पुढील ४ आठवडे अतिशय चिंतेचे'

pune corona update : देशात करोनाचे सर्वाधिक रुग्ण पुणे जिल्ह्यात, तर महाराष्ट्रातील ७ जिल्हे टॉपवर

हर्षवर्धन यांनी मंगळवारी ११ राज्यांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. देशात करोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९२.३८ टक्के आहे. तर मृत्यू दर हा १.३० टक्के आहे. गेल्या २ महिन्यांत देशात करोना रुग्णांच्या संख्येत अचानक वाढ झाली. करोना रुग्ण वाढीमागे नागरिकांचा निष्काळजीपणा आणि प्रशासनाच्या काही उणीवा आहेत. पण देशातील करोनाची स्थिती नियंत्रणात आहे, असं हर्षवर्धन यांनी सांगितलं.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज