अ‍ॅपशहर

no entry for saree : साडी नेसून आल्यामुळे महिलेला रेस्टॉरंटमध्ये नो एन्ट्री! व्हिडिओ व्हायरल

भारतीय पोषाख केल्याने भारतातीलच एका रेस्टॉरंटमध्ये महिलेला प्रवेश नाकारण्यात आला. विशेष म्हणजे हे रेस्टॉरंट राजधानी दिल्लीतील आहे. रेस्टॉरंटमधील या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Sep 2021, 7:13 pm
नवी दिल्लीः दिल्लीत पॉश भागात असलेल्या एका रेस्टॉरंटमध्ये एका महिलेला प्रवेश दिला गेला नाही. विशेष म्हणजे ती महिला साडी नेसून आली होती म्हणून तिला प्रवेश नाकारण्यात आला. साडीला परवानगी नाहीए का? असा प्रश्न महिला हॉटेलमधील कर्मचाऱ्याला विचारते. साडी स्मार्ट कॅज्युअल म्हणून गणली जात नाही. आणि हॉटेल फक्त स्मार्ट कॅज्युअल्सना परवानगी देते, असं उत्तर हॉटेलच्या कर्मचाऱ्याने दिलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम no entry for saree restaurant in south delhi denies entry to woman in saree video viral
साडी नेसून आलेल्या महिलेला रेस्टॉरंटमध्ये नो एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल


हॉटेलमधल्या या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर अनेक नागरिकांनी प्रतिक्रिया देत हॉटेलविरोधात संतप्त प्रतिक्रिया दिल्या. व्हायरल व्हिडिओ महिला हॉटेलमध्ये प्रवेश करत असताना तिला साडीमुळे रोखण्यात येतं. यावेळी महिला रेस्टॉरंटच्या कर्मचाऱ्यांकडून लेखी स्वरूपात कारण देण्याची मागणी करते. साडी नेसून आल्यामुळे हॉटेलमध्ये येण्याची परवानगी नाही, असं लिहून द्या असं ग्राहक महिला हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना सांगताना व्हायरल व्हिडिओत दिसत आहे.

साडी ही 'स्मार्ट वेअर' नाही हे कोणी ठरवलं? मी यूएस, यूएई तसेच यूकेमधील सर्वोत्तम रेस्टॉरंटमध्ये साडी नेसून गेली आहे. पण तिथे आपल्याला कोणी अडवलं नाही. काही अक्विला रेस्टॉरंट्स भारतात एक ड्रेस कोड सेट करतात आणि ठरवतात की साड्या स्मार्ट कॅज्युअल नाहीत. हे विचित्र आहे, असं व्हिडिओ ट्वीटरवर शेअर करत शेफाली वैद्य म्हणाल्या.

COVID victims families : केंद्राचा दिलासा! करोनाने मृत्यू झालेल्यांच्या वारसांना ५० हजारांची मदत देण्यास

स्मार्ट कॅज्युअल काय प्रकार आहे? ख्रिश्चन-मुस्लिम देशांमध्ये सुद्धा साडीवर अशी बंदी नाही, भारतात अशी मानसिकता का? त्याचबरोबर रेस्टॉरंटच्या रेटिंगबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. फरमान बडे आणि हॉटेलला दिलेले रेटिंग कसे आहेत बघा, असं एका युजरने म्हटलंय.

girls fight over boyfriend : एका बॉयफ्रेंडसाठी तीन मुली भिडल्या, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या; व्हिडिओ व्हायर

तर अनिता चौधरी यांनी हा व्हिडिओ ट्विट करत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि महिला आयोगालाही टॅग केलं आहे आणि साडी घालणं बंद करावं का? असा प्रश्न विचारला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज