अ‍ॅपशहर

'महापुरुषांच्या नावे असलेल्या सुट्ट्या बंद'

उत्तर प्रदेश राज्यात महापुरुषांच्या जयंतीनिमित्त तसेच पुण्यतिथीनिमित्त मिळणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्या यापुढील काळात बंद केल्या जाणार आहेत. तशी घोषणा यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

Maharashtra Times 14 Apr 2017, 10:16 pm
मटा ऑनलाइन वृत्त। लखनऊ
महाराष्ट्र टाइम्स.कॉम no holiday in schools on birth anniversaries of great personalities says yogi
'महापुरुषांच्या नावे असलेल्या सुट्ट्या बंद'


उत्तर प्रदेश राज्यात महापुरुषांच्या जयंतीनिमित्त तसेच पुण्यतिथीनिमित्त मिळणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्या यापुढील काळात बंद केल्या जाणार आहेत. तशी घोषणा यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी या सुट्ट्यांना कात्री लावण्याचे जाहीर केले. 'आता महापुरुषांच्या नावाने मिळणाऱ्या सार्वजनिक सुट्ट्यांची परंपरा बंद होणार आहे. या निर्णयामुळे काही लोकांचा आक्षेप असेल याची आपल्याला कल्पना आहे, परंतु हे करणे आवश्यक आहे', अशा शब्दात मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी आपली भूमिका मांडली आहे.

मुख्यमंत्री आदित्यनाथ पुढे म्हणाले की, आज शाळा बंद का, याबाबत गावांमधील विद्यार्थ्यांना काहीही माहिती नसते. ते म्हणतात की आज रविवार आहे. मात्र आज रविवार नाही असे त्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर ते म्हणतात की, आज सुट्टी असल्याने आम्हाला वाटले की आज रविवार असावा. महापुरुषांच्या जयंती-पुण्यातिथीबाबत मुलांना काही सांगितले गेलेच नाही, तर मुलांना त्यांच्या आदर्शांबाबत माहिती कशी बरे मिळेल? याच साठी ही सुट्ट्यांची परंपरा बंद व्हायला हवी.

अशा दिवसांमध्ये शाळा सुरू ठेवल्या तर शाळांमध्ये एक-दोन तासांचा विशेष कार्यक्रम आयोजित करता येईल. या कार्यक्रमाच्या माध्यमातून संबंधित महापुरुषांबाबत मुलांना माहिती दिली जाईल असा संकल्पही मुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमात जाहीर केला.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, उत्तर प्रदेशात शाळांचे २२० शैक्षणिक दिवस अशा सुट्ट्यांमुळे १२० दिवसांचे झाले आहेत. अशीच परंपरा पुढे सुरू राहिली तर एक दिवस शाळेसाठी कोणताही दिवस शिल्लक राहणार नाही, अशी भीतीही आदित्यनाथ यांनी व्यक्त केली.

'उत्तर प्रदेशात राजकारणाच्या नावावर आतापर्यंत ४२ सुट्ट्य़ा घोषित करण्यात आल्या आहेत. यात १७ सुट्ट्या जातीय गणिते लक्षात ठेवूनच दिल्या गेल्यात. सुट्ट्यांबाबत विचार केला तर उत्तर प्रदेश देशात प्रथम स्थानी आहे. या घोषित दिवसांना ५२ शनिवार आणि रविवार जोडले तर १४६ दिवस शासकीय कार्यालये बंद राहतील. यात कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या १५ भरपगारी रजा आणि १४ कॅज्युअल लिव्ह मोजल्या, तर जवळजवळ १७५ दिवस सुट्टी मिळते. यानुसार कर्मचाऱ्यांना सुमारे ६ महिने कार्यालयात जाण्याची गरजच नाही. या सुट्ट्या राजकीय संतुलनासाठी या सुट्ट्या मिळत आल्या आहेत. कदाचित याच सुट्ट्यांवर पहिली कुऱ्हाड कोसळेल', असेही आदित्यनाथ आपल्या भाषणात पुढे म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज