'जवानाचे अपहरण नाही' श्रीनगर : काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातून लष्कराच्या जवानाचे त्याच्या घरातून अपहरण झाल्याचे वृत्त संरक्षण मंत्रालयाने शनिवारी फेटाळले. जवान सुरक्षित असल्याची माहिती मंत्रालयाने दिली आहे. 'जम्मू अँड काश्मीर लाइट इन्फण्ट्री रेजिमेंट'चे जवान मोहम्मद यासीन यांच्या कुटुंबीयांनी मोहम्मदचे काही जणांनी अपहरण झाल्याचे म्हटले होते. मात्र संरक्षण मंत्रालयाने हे वृत्त फेटाळले असून, ते चुकीचे असल्याचे नमूद केले.
'जवानाचे अपहरण नाही'
काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यातून लष्कराच्या जवानाचे त्याच्या घरातून अपहरण झाल्याचे वृत्त संरक्षण मंत्रालयाने शनिवारी फेटाळले...
MT 10 Mar 2019, 4:00 am