अ‍ॅपशहर

काश्मीरप्रश्न नॉर्वेच्या संसदेत मांडणार

नॉर्वे देशाच्या संसदेत काश्मीर मुद्द्यावर चर्चा करण्यात येणार आहे. नॉर्वेचे परराष्ट्र मंत्री बॉर्ग बेंद्रा काश्मीर मुद्द्यावर येत्या २३ मे या दिवशी संसदेत निवेदन देणार आहेत. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नॉर्वेच्या संसदेचे सदस्य आणि ख्रिश्चन डेमॉक्रॅटिक पक्षाचे प्रमुख केन्यू अरील्ड हॅरड यांनी काश्मीर मुद्दा संसदेत मांडला होता.

Maharashtra Times 19 May 2017, 9:49 pm
मटा ऑनलाइन वृत्त। नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम norwegian parliament to hold debate on kashmir conflict
काश्मीरप्रश्न नॉर्वेच्या संसदेत मांडणार

नॉर्वे देशाच्या संसदेत काश्मीर मुद्द्यावर चर्चा करण्यात येणार आहे. नॉर्वेचे परराष्ट्र मंत्री बॉर्ग बेंद्रा काश्मीर मुद्द्यावर येत्या २३ मे या दिवशी संसदेत निवेदन देणार आहेत. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नॉर्वेच्या संसदेचे सदस्य आणि ख्रिश्चन डेमॉक्रॅटिक पक्षाचे प्रमुख केन्यू अरील्ड हॅरड यांनी काश्मीर मुद्दा संसदेत मांडला होता.

काश्मीर मुद्दा नॉर्वेच्या संसदेत जाण्यामागे काश्मिरी स्कँडिनेव्हियन काउंसिलचा हात असल्याचे बोलले जात आहे. काश्मिरी स्कँडिनेव्हियन ही संस्था स्वत:ला प्रमुख फुटिरतावादी संघटनेची सहकारी संस्था असल्याचे सांगते. नॉर्वेच्या संसदेत हॅरड हे काश्मीर मुद्दा मांडणार आहेत याबाबत आम्हाला माहिती आहे आणि संसदीय प्रक्रियेअंतर्गत हॅरड यांनी मांडलेल्या विषयावर परराष्ट्र मंत्री बेंद्रा उत्तर देणार आहेत अशी माहिती नॉर्वे दूतावासाच्या प्रवक्त्याने दिली आहे.

काश्मीर प्रश्न शांततेच्या मार्गाने सुटण्याच्या दृष्टीने भारत आणि पाकिस्तान या दोन्ही पक्षांचा सहभाग असावा यासाठी परराष्ट्र मंत्री काय पाऊल उचलणार आहेत असे परराष्ट्र मंत्र्यांना विचारण्यात आले असल्याचे याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तात म्हटले आहे. काश्मीर प्रश्नावर तोडगा निघावा यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायाने सक्रियता दाखवावी असा सल्ला परराष्ट्र मंत्र्यांना देण्यात आला आहे. यूरोपियन युनियन, अमेरिका आणि इतर देशांचे सहकार्य मिळवून नॉर्वेने संयुक्त राष्ट्र किंवा इतर एखादा आंतरराष्ट्रीय मंच हिंसा कमी व्हावी या दिशेने काम करू शकतात किंवा कसे याची चाचपणी करणे गरजेचे आहे या दृष्टीनेही नॉर्वे देशात प्रयत्न केले जात असल्याचे वृत्त आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज