अ‍ॅपशहर

सर्वोच्च न्यायालयात २ डिसेंबरला सुनावणी

नोटाबंदीच्या निर्णयावर आक्षेप घेणा‍ऱ्या विविध याचिका देशभरातील उच्च न्यायालयांमध्ये दाखल झाल्या आहेत. या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची केंद्र सरकारची विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे.

Maharashtra Times 26 Nov 2016, 12:00 am
नोटाबंदीविरोधातील सर्व याचिकांचा एकत्रित विचार
महाराष्ट्र टाइम्स.कॉम note ban sc fixes hearing on all pleas challenging demonetisation on 2 december
सर्वोच्च न्यायालयात २ डिसेंबरला सुनावणी


वृत्तसंस्था, नवी दिल्ली

नोटाबंदीच्या निर्णयावर आक्षेप घेणा‍ऱ्या विविध याचिका देशभरातील उच्च न्यायालयांमध्ये दाखल झाल्या आहेत. या सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची केंद्र सरकारची विनंती सर्वोच्च न्यायालयाने मान्य केली आहे. ही सुनावणी २ डिसेंबर रोजी होणार आहे. नोटाबंदीचा निर्णय घटनात्मकदृष्ट्या वैध नाही आणि या निर्णयामुळे सर्वसामान्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे, हे दोन प्रमुख मुद्दे सर्व याचिकांमध्ये आहेत. हे दोन्ही मुद्दे आम्ही तपासून पाहू, असे सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शुक्रवारी सांगितले.

नोटाबंदीविरोधात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या याचिकांमधील मुद्दे आणि देशभरातील उच्च न्यायालयांमध्ये दाखल झालेल्या याचिकांमधील मुद्दे भिन्न आहेत, असा दावा करीत अॅड. कपिल सिबल यांनी याचिकांवरील सुनावणी २ डिसेंबरऐवजी २९ नोव्हेंबर रोजी घेण्याची विनंती केली होती. मात्र सरन्यायाधीश टी. एस. ठाकूर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने ही विनंती फेटाळून लावली.

सर्व याचिकांवर २ डिसेंबर रोजी सुनावणी सुरू करू. नोटाबंदी घटनात्मकदृष्ट्या वैध आहे की नाही आणि सर्वसामान्यांना होणार त्रास हे दोन्ही मुद्दे आम्ही तपासून पाहू, असे खंडपीठाने स्पष्ट केले.

दरम्यान, न्यायालयाचे कामकाज सुरू असताना याचिकाकर्त्यांच्या अनेक वकिलांनी एकाचवेळी मुद्दे मांडण्यास सुरुवात केली. त्यावर आपली नाराजी व्यक्त करीत खंडपीठाने सांगितले की, न्यायालयाची शिस्त पाळत नसाल तर सुनावणी सहा आठवड्यांसाठी तहकूब केली जाईल. तुमच्यापैकी बाजू मांडण्यासाठी एका वकिलाचे नाव निश्चित करा. त्यानंतर वरिष्ठ वकील संजय हेगडे यांनी कपिल सिबल यांचे नाव पुढे केले.

नव्या नोटा बिनधोक वापरा!

नवी दिल्ली: ५०० आण‌ि दोन हजारच्या नव्या नोटांच्या नोटा पूर्णपणे कायदेशीर आहेत, असे स्पष्ट‌ीकरण रंग, छपाईमध्ये फरक असल्याच्या तक्रारींनंतर रिझर्व्ह बँकेने दिले आहे. ‘एखाद्याला या नोटा वापरायच्या नसतील तर ते त्या आरबीआयकडे परत पाठवू शकतात. नोटेची पूर्ण किंमत परत देऊ,’ असे सांगण्यात आले.


दोन मृत्यू

नागपूर / बलिया ः पैसे काढण्यासाठी बँकेच्या रांगेत उभ्या असलेल्या इंद्राणी देवी (७०) या वृद्धेचा मृत्यू झाल्याची घटना बलियाजवळ रातसद येथे घडली. गुरुवारी तीन तीस ती सेंट्रल बँकेच्या रांगेत उभी होती. नागपुरात स्टेट बँकेचे माजी रोखपाल अनंता बापट (५८) यांनी नोटाबंदीच्या धसक्याने आत्महत्या केली.


पुण्यात एक कोटी जप्त

पुणे ः पुण्यात पोलिसांनी भरत शहा या व्यावसायिकाकडून गुरुवारी पाचशे व हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात एक कोटी १२ लाख रुपये जप्त करण्यात आले. हा काळा पैसा कायदेशीर करण्यासाठी २५ टक्के कमिशनचा व्यवहार सुरू असताना ही कारवाई झाली. निफाडमध्ये दोन वाहनांमध्ये जुन्या व नव्या १४ लाख रुपयांच्या नोटा सापडल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज