अ‍ॅपशहर

मोदींच्या कार्यक्रमासाठी 'आधार' बंधनकारक

'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात यायचं असेल तर आधार कार्ड घेऊन येणं बंधनकारक आहे. जर विद्यार्थ्यांनी आधार कार्ड आणलं नाही तर विद्यार्थ्यांना कार्यक्रमात येऊ दिलं जाणार नाही', असा आदेशच पाटणा विद्यापीठानं काढल्याचे वृत्त 'द टेलिग्राफ'ने दिले आहे.

Maharashtra Times 10 Oct 2017, 11:42 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम now the aadhaar card is compulsory for modis program
मोदींच्या कार्यक्रमासाठी 'आधार' बंधनकारक


'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमात यायचं असेल तर आधार कार्ड घेऊन येणं बंधनकारक आहे. जर विद्यार्थ्यांनी आधार कार्ड आणलं नाही तर विद्यार्थ्यांना कार्यक्रमात येऊ दिलं जाणार नाही', असा आदेशच पाटणा विद्यापीठानं काढल्याचे वृत्त 'द टेलिग्राफ'ने दिले आहे.

पाटणा विद्यापीठाच्या शताब्दी वर्षाचा कार्यक्रम शनिवारी होत असून या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहेत. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी पदव्युत्तर शिक्षण घेणारे विद्यार्थी आणि पीएचडी करणाऱ्यांसाठी आधार कार्डची सक्ती करण्यात आली आहे. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांची संख्या मर्यादीत राहावी या हेतूनं जिल्हा प्रशासनानं आधार कार्ड बंधनकारक करण्याची सूचना केली असल्याची माहिती विद्यापीठाच्या उपकुलगुरू डॉली सिन्हा यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी कार्यक्रमाला येत असल्याने कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी खास खबरदारी घेण्यात येत आहे. कार्यक्रमासाठी केवळ पदव्यूत्तर शिक्षण घेणारे आणि पीएचडी करणारे विद्यार्थीच उपस्थित राहू शकतील, त्यासाठी त्यांना आधार कार्ड दाखवावे लागेल. विद्यार्थी संघटनेशी संबंधित असलेल्या कोणत्याही विद्यार्थ्याला या कार्यक्रमात प्रवेश दिला जाणार नाही. मोदींसमोर एखादा अनुचित प्रकार घडू नये यासाठी विद्यापीठ प्रशासनाकडून ही काळजी घेण्यात येत आहे. पदवीचं शिक्षण घेणाऱ्या मर्यादित विद्यार्थ्यांना तसेच एनसीसी किंवा एनएसएसशी संबंधित विद्यार्थ्यांनाही प्रवेश दिला जाणार आहे, असे सिन्हा म्हणाल्या.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज