अ‍ॅपशहर

सौर ऊर्जेसाठी एक अब्ज डॉलर

देशात सौर ऊर्जेचा प्रसार व्हावा, तसेच त्याचा वापर वाढावा यासाठी जागतिक बँकेने एक अब्ज डॉलरचे अर्थसाह्य देण्याचे मान्य केले आहे. यासाठी जागतिक बँकेने इंटरनॅशनल सोलर अलायन्स या भारताच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या १२१ देशांच्या गटाबरोबर करारही केला आहे.

Maharashtra Times 1 Jul 2016, 9:06 am
नवी दिल्लीः देशात सौर ऊर्जेचा प्रसार व्हावा, तसेच त्याचा वापर वाढावा यासाठी जागतिक बँकेने एक अब्ज डॉलरचे अर्थसाह्य देण्याचे मान्य केले आहे. यासाठी जागतिक बँकेने इंटरनॅशनल सोलर अलायन्स या भारताच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या १२१ देशांच्या गटाबरोबर करारही केला आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम one billion dollars for solar energy
सौर ऊर्जेसाठी एक अब्ज डॉलर


या करारान्वये जगभरातील सौर ऊर्जा प्रकल्पांच्या उभारणीसाठी २०३०पर्यंत जागतिक बँक एक लाख कोटी डॉलर इतकी रक्कम पुरवणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली, ऊर्जामंत्री पियूष गोयल तसेच जागतिक बँकेचे समूह अध्यक्ष जिम योंग किम यांच्या उपस्थितीत या करारावर सह्या करण्यात आल्या.

भारतातील सौर ऊर्जा क्षेत्रात करण्यात येणारी एक अब्ज डॉलरची गुंतवणूक मुख्यतः ऊर्जा निर्मितीसाठी करण्यात येणार आहे. यामध्ये छतावरील सौर ऊर्जा निर्मिती तंत्रज्ञान, सोलर पार्कसाठी पायाभूत सुविधा, बाजारात नावीन्यपूर्ण सोलर तंत्रज्ञान आणणे तसेच सूर्यप्रकाश भरपूर असणाऱ्या राज्यांतून सौर ऊर्जेचे पारेषण करणे यासाठीच्या प्रकल्पांतून ही गुंतवणूक होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज