अ‍ॅपशहर

मोठी घटना! विटंबनेचा आरोप, जमावाच्या बेदम मारहाणीत आणखी एका तरुणाचा मृत्यू

गुरुद्वारा साहिबमध्ये निशाण साहिबची विटंबना केल्याच्या आरोपावरून एका तरुणाला जमावाने बेदम मारहाण केली. या घटनेत तरुणाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी सरकारने एसआयटी नेमून चौकशीचे आदेश दिले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Dec 2021, 4:43 pm
चंदीगड : कपूरथला येथील निजामपूर वळणावर गुरुद्वारा साहिबमध्ये निशाण साहिबची ( शिख धर्मियांचा झेंडा ) विटंबना केल्याच्या आरोपाखाली पकडलेल्या तरुणाची पोलिसांच्या उपस्थितीत बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. हत्येसाठी सर्वांनी शस्त्रे आणावीत, अशी घोषणा गुरुद्वारातून करण्यात आली. त्यानंतर जमावाने आत घुसून एका तरुणाला बेदम मारहाण केली. निशाण साहिबची विटंबना केल्याच्या आरोपावरून या तरुणाला आज सकाळीच ग्रामस्थांनी पकडले होते. त्यानंतर त्याला एका खोलीत बंद करण्यात आले. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन आपल्यासोबत नेण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी पोलीस आणि जमावात झटापट झाली. त्यानंतर पोलिसांनी हवेत गोळीबार केला.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम one more beaten to death for alleged sacrilege attempt in punjab
विटंबनेचा आरोप, जमावाच्या बेदम मारहाणीत आणखी एका तरुणाचा मृत्यू


पोलिस आणि आंदोलकांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. पोलिसांनी आरोपीवर कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले. मात्र जमावाने ऐकले नाही आणि आरोपी तरुणाची हत्या केली. विटंबनेच्या आरोपावरून सलग दुसऱ्या दिवशी आणखी एक हत्या झाला आहे. याआधी शनिवारी संध्याकाळी अमृतसरमध्ये विटंबनेचा आरोप असलेल्या तरुणाची हत्या करण्यात आली होती.

दरम्यान, ही दुर्दैवी घटना आहे. या घटनेप्रकरणी डीसीपींच्या नेतृत्वात एसआयटी नेमण्यात आली आहे. दोन दिवसांत एसआयटी आपला अहवाल देईल, असे पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा म्हणाले.

आपली शस्त्रे घेऊन या, असे आवाहन घटनास्थळी जमलेल्या जमावाला लाऊडस्पीकरवरून करण्यात आले. यानंतर मोठा जमाव खिडकी तोडून आरोपी तरुणाला ठेवलेल्या खोलीत घुसला. यानंतर जमावाने तरुणाची हत्या केली. ही घटना घडली, त्यावेळी कपूरथलाचे एसएसपी एचपीएस खख हे गेटबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त घेऊन उभे होते. या घटनेने पंजाबमधील पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून त्यांच्या उपस्थितीतच अशी घटना घडली आहे.

Golden Temple धक्कादायक: सुवर्ण मंदिरात जमावाच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू; पावित्र्य भंग झाल्याने...

पंजाबमध्ये शनिवारी संध्याकाळी अमृतसरनंतर सलग दुस-या दिवशी रविवारी सकाळी कपूरथला येथे विटंबना झाल्याची घटना घडली. कपूरथला येथील निजामपूर वळणावर गुरुद्वारामध्ये एका तरुणाने निशान साहिबची विटंबना केली. त्यानंतर गावकऱ्यांनी त्याला पकडून खोलीत डांबले केले. याची माहिती मिळताच पोलिसांनी तेथे पोहोचले. त्यांनी आरोपीला ताब्यात घेतले.

पोलिसांवर विश्वास नसल्याचे सांगत गावकऱ्यांनी आरोपीला ताब्यात देण्याची मागणी केली. यानंतर परिस्थिती चिघळली. पोलिसांना घटनास्थळी परिस्थिती हाताळता आली नाही आणि शेवटी जमावाने आरोपीची हत्या केली. गावकऱ्यांनी त्याचा व्हिडिओही बनवला.

Basavaraj Bommai: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान; 'शिवाजी महाराज, संगोळी रायण्णा हे तर...'

तरुणाचा मृतदेह घेऊनच पोलीस रुग्णालयात आले : एसएमओ

सुमारे २२ वर्षांचा तरुण आहे. त्याचा मृतदेह थेट शवागारात ठेवण्यात आला. हॉस्पिटलमध्ये आणलं त्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला होता. तरुणाचा मृत्यू कसा झाला हे आता पोस्टमार्टमनंतरच कळेल, असे कपूरथला सिव्हिल हॉस्पिटलचे एसएमओ डॉ. संदीप धवन यांनी सांगितले.

आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण...

पहाटे ४ च्या सुमारास नेहमी प्रमाणे गावकरी उठले. आरोपी तरुण हा निशान साहिबची विटंबना करताना त्यांना दिसला होता. यानंतर आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण दोन तासांनी त्याला गावकऱ्यांनी पकडले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज