अ‍ॅपशहर

बादलीत बुडून १४ महिन्याच्या मुलीचा मृत्यू

घरात खेळत असलेल्या लहान मुलांकडे दुर्लक्ष करणे त्यांच्या जीवावर बेतू शकते. नवी दिल्लीतील एका घटनेत बादलीत बुडाल्याने एका १४ महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू झाला.

Maharashtra Times 27 Jul 2017, 9:06 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम one year old girl child died into bucket
बादलीत बुडून १४ महिन्याच्या मुलीचा मृत्यू


घरात खेळत असलेल्या लहान मुलांकडे दुर्लक्ष करणे त्यांच्या जीवावर बेतू शकते. नवी दिल्लीतील एका घटनेत बादलीत बुडाल्याने एका १४ महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू झाला.

नवी दिल्लीतील नांगलोई भागातील अमर कॉलनीत ही घटना घडली. के-ब्लॉकमध्ये राहणाऱ्या एका कुटुंबातील १४ महिन्यांची सृष्टी गॅलरीमध्ये खेळत होती. घरात दुरूस्तीचे काम सुरू होते. सृष्टीची आई त्या कामावर लक्ष देत होती. मात्र, अचानक काही वेळेनंतर ती दिसेनाशी झाली. कुठे तरी लपली असेल असे समजून तिच्या आईने तिला शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, अखेर बाथरुममध्ये असणाऱ्या भरलेल्या पाण्याच्या बादलीत ती बुडालेली आढळली. तिला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. रुग्णालयाने पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांना या घटनेची नोंद केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मुलीची आई आणि इतरांकडे चौकशी केली. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज