अ‍ॅपशहर

JNU Umar Khalid: उमर खालिदवर गोळीबाराचा प्रयत्न

जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. या हल्ल्यात उमर खालिद बचावला असून तो सुखरुप आहे. कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या बाहेर हा गोळीबार झाल्याचे वृत्त आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 13 Aug 2018, 3:31 pm
नवी दिल्ली:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम umar-khalid


जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील विद्यार्थी नेता उमर खालिदवर गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. या हल्ल्यात उमर खालिद बचावला असून तो सुखरुप आहे. कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियाच्या बाहेर हा गोळीबार झाला. घटनास्थळापासून जवळच संसद भवन आहे. त्यामुळे अतिसुरक्षित परिसरात गोळीबार झाल्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न निर्माण झाले आहे.


कॉन्स्टिट्यूशन क्लब ऑफ इंडियामध्ये आज दुपारी २.३० वाजण्याच्या सुमारास एका परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी उमर खालिद आला होता. क्लब जवळच असलेल्या चहाच्या टपरीजवळ उमर आपल्या सहकाऱ्यांसह उभा होता. त्यावेळी पांढरा शर्ट घातलेल्या एका अज्ञात इसमाने उमरवर गोळीबार केला. यातून उमर खालिद थोडक्यात बचावला. गोळीबारानंतर हल्लेखोर पसार झाला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज