अ‍ॅपशहर

oxygen cylinder : रुग्णालयांमधील ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून गृह मंत्रालयाची राज्यांना सूचना

करोना रुग्णांच्या संख्येच वाढत होत असल्याने मेडिकल ऑक्सिजनची मागणी वाढली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. ऑक्सिजनचा उपयोग हा काळजीपूर्वक करण्यास सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 1 May 2021, 12:38 am
नवी दिल्लीः देशात करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे परिस्थिती गंभीर ( covid 19 patient ) बनली आहे. अनेक राज्यांमधून ऑक्सिजनच्या तुटवड्याच्या तक्रारी येत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्या्ंना ऑक्सिजनबाबत काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. राज्यांना उपलब्ध असलेल्या ऑक्सिजनला महत्त्वाची वस्तू म्हणून घेण्यास आणि सर्व खासगी व सरकारी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या वापराचा आढावा घेण्यास सांगितलं आहे. करोना संसर्ग सुरू झाल्यापासूनच ऑक्सिजन बेड ही प्रमुख क्लिनिकल आवश्यकता म्हणून केंद्र सरकारने आधीच स्पष्ट केल्याचं आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितलं.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम oxygen cylinders for COVID 19 patients
रुग्णालयांमधील ऑक्सिजनच्या तुटवड्यावरून गृह मंत्रालयाच्या राज्यांना सूचना


राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी ऑक्सिजनचा उपयोग हा विवेकबुद्धीने करावा. ऑक्सिजनचा अपव्यय होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घेण्याचं आवाहनही केंद्राने केलं आहे. नागरिकांनी मेडिकल ऑक्सिजनबाबत घाबरू नये. देशात याचा पुरेसा साठा आहे. तसंच बहुतेक करोना रुग्णांना मेडिकल ऑक्सिजनची गरजही पडत नाही. प्रकृती अधिक बिघडल्यावरच याची आवश्यकता असते. यामुळे सर्वांनी आरोग्य मंत्रालयाच्या सूचनांचं पालन करावं, असं गृह मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांनी सांगितलं.

coronavirus : दाखल करोना रुग्णांच्या कुटुंबीयांसाठी व्हिडिओ किंवा ऑडिओ कॉलची व्यवस्था करा, केंद्राचे राज्यांना निर्देश

सरकार ऑक्सिजन बेडची संख्या वाढवण्यासाठी उद्योगांकडील जम्बो कंटेनर आधारीत कोविड हॉस्पिटल स्थापन करण्याच्या योजनेवर काम करत आहे. देशातील विविध भागांमध्ये ऑक्सिजन प्लांट उभरण्यात येत आहेत. तसंच सध्या उत्पादन सुरू असलेल्या प्लांटची क्षमता वाढण्यात आली आहे. स्टील उद्योगांनीही लिक्विड ऑक्सिजनचे उत्पादन वाढवले आहे. यामुळे ऑक्सिजनचा मागणी पूर्ण करता येणार आहे, अशी माहिती गृह मंत्रालयाच्या अतिरिक्त सचिवांनी दिली.

india coronavirus : 'सोशल मीडियावर ऑक्सिजन, बेड आणि औषधांसाठी पोस्ट करणाऱ्यांवर कारवाई न

महत्वाचे लेख