अ‍ॅपशहर

पाकचं पितळ उघडं, मोदींच्या पत्राचा विपर्यास

माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतल्या घेतल्या भारताबद्दल पसरवल्या गेलेल्या एका खोट्या बातमीचा पर्दाफाश झाला आहे. पाकिस्तानचे नवनियुक्त परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सोमवारी दावा केला होता की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इम्रान खान यांचं अभिनंदन केलं आणि चर्चेचा प्रस्ताव ठेवला. पण असा कोणताही चर्चेचा प्रस्ताव भारताने पाठवला नसल्याचं दिल्लीतील सरकारी सूत्रांनी स्पष्ट केलं आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 20 Aug 2018, 3:53 pm
नवी दिल्ली / इस्लामाबाद :
महाराष्ट्र टाइम्स.कॉम imran-modi

माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतल्या घेतल्या भारताबद्दल पसरवल्या गेलेल्या एका खोट्या बातमीचा पर्दाफाश झाला आहे. पाकिस्तानचे नवनियुक्त परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी सोमवारी दावा केला होता की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इम्रान खान यांचं अभिनंदन केलं आणि चर्चेचा प्रस्ताव ठेवला. पण असा कोणताही चर्चेचा प्रस्ताव भारताने पाठवला नसल्याचं दिल्लीतील सरकारी सूत्रांनी स्पष्ट केलं आहे.

भारत आणि पाकिस्तानमधील चर्चा गेली दोन वर्षे बंद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांचे अभिनंदन करणारे पत्र जरूर पाठवले आहे, पण त्यात चर्चेचा कोणताही प्रस्ताव नाही.

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी यापूर्वी म्हटलं होतं की, भारताशी सातत्याने विनाखंड चर्चेची आवश्यकता आहे. ते म्हणाले होते, 'आपण शेजारी आहोत. आपल्यात खूप काळापासून काही न सुटलेले प्रश्न आहेत. दोन्ही देशांना या समस्यांची जाण आहे. आपल्याकडे चर्चेशिवाय अन्य पर्याय नाही.'

पत्रात काय होतं?

सूत्रांच्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इम्रान खान यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की, 'भारत पाकिस्तानसोबत शांततापूर्ण शेजारी संबंधांसाठी कटिबद्ध आहे. भारत पाकिस्तानशी सकारात्मक आणि आर्थिक भागीदारीसाठी आशावादी आहे. दहशतवादमुक्त दक्षिण आशियासाठी दोन्ही देशांनी काम करायला हवं.' यात कुठेही चर्चेचा कोणताही प्रस्ताव नव्हता.

मात्र जिओ न्यूजनुसार, पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी सांगितले की भारत आणि पाकिस्तानला वास्तवाला सामोरे जात पुढे जायला हवे. त्यांनी असाही दावा केला की मोदींनी इम्रान खान यांना पत्र लिहून संकेत दिलेत की मोदी दोन्ही देशांत पुन्हा चर्चा सुरू करतील.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज