अ‍ॅपशहर

पाक सैनिकांनी दाखवले पांढरे निशाण

पाकव्याप्त काश्मीरमधील हाजीपीर भागात नियंत्रण रेषेजवळ भारतीय जवानांच्या गोळाबारात दोन पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते. त्यांचे मृतदेह घेण्यासाठी पाक सैनिकांना अखेर पांढरे निशाण दाखवून युद्धविरामाची विनंती करावी लागली.

महाराष्ट्र टाइम्स 15 Sep 2019, 6:34 am
नवी दिल्ली: पाकव्याप्त काश्मीरमधील हाजीपीर भागात नियंत्रण रेषेजवळ भारतीय जवानांच्या गोळाबारात दोन पाकिस्तानी सैनिक ठार झाले होते. त्यांचे मृतदेह घेण्यासाठी पाक सैनिकांना अखेर पांढरे निशाण दाखवून युद्धविरामाची विनंती करावी लागली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pak


भारतीय लष्कराने एक मिनीट ४७ सेकंदांचा व्हिडीओ जारी केला आहे. यामध्ये पाकिस्तानी सैनिक नियंत्रण रेषेजवळ भारतीय जवानांच्या गोळीचे लक्ष्य झालेल्या त्यांच्या सहकाऱ्यांचे मृतदेह घेऊन जाण्यासाठी पांढरे निशाण दाखवताना दिसत आहेत.

भारतीय जवानांच्या गोळीबारात ११ सप्टेंबरला पाकव्याप्त काश्मीरमधील हाजीपीर सेक्टरमधील त्यांच्या पंजाब रेजिमेंटचा शिपाई गुलाम रसूल याचा मृत्यू झाला होता. पंजाबी मुस्लिम असलेला रसूल पंजाब प्रांतातील बहावलनगर येथील रहिवासी होता. सुरुवातीला पाक सैनिकांनी त्याचा मृतदेह घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये अन्य एका पंजाबी मुस्लिम सैनिकाचा मृत्यू झाला. दोन दिवसांनंतरही या दोघांचे मृतदेह घेऊन जाण्यात यश न आल्याने अखेर १३ सप्टेंबरला त्यांना पांढरे निशाण दाखवून शांतता व युद्धविरामाची विनंती करावी लागली. भारतीय जवान शस्त्रूच्या मृत सैनिकांचा आदर करत असल्याने पाक सैनिकांना हे दोन्ही मृतदेह घेऊन जाऊ दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज