अ‍ॅपशहर

पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; एक जवान शहीद

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 28 May 2017, 5:56 pm
मटा ऑनलाइन वृत्त । श्रीनगर
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ceasfire


पाकिस्तानकडून केरान सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करण्यात आला. पाकिस्तानच्या या गोळीबारात लष्कराचा एक कर्मचारी शहीद झाला. तर एक जण गंभीर झाला आहे.

भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी, रात्री केरान सेक्टरमध्ये पाकिस्तानने गोळीबार करत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. या गोळीबारात लष्कराचा एक कर्मचारी शहीद झाला तर, एक जवान गंभीर झाला आहे. जखमी जवानावर उपचार सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. दरम्यान, पूंछ सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पहाटेच्या सुमारास घुसखोरी करणारा पाकिस्तानी घुसखोर लष्कराच्या चकमकीत ठार झाला.

मागील काही दिवसांपासून पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघनाचे प्रकार वाढले आहेत. भारतीय लष्कराकडूनदेखील पाकिस्तानच्या गोळीबाराला सडेतोड उत्तर दिले जात आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज