अ‍ॅपशहर

पाक उच्चायुक्तालयातील अधिकारी अटकेत

पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याला हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. या अधिकाऱ्याकडून भारतीय लष्कराशी संबंधित अत्यंत गोपनीय दस्तावेज जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाईनंतर भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसीत यांना परराष्ट्र मंत्रालयाने समन्स पाठवले आहे.

Maharashtra Times 27 Oct 2016, 11:07 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pakistan high commission staffer arrested for espionage
पाक उच्चायुक्तालयातील अधिकारी अटकेत

पाकिस्तानच्या उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याला हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली दिल्ली पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केली आहे. या अधिकाऱ्याकडून भारतीय लष्कराशी संबंधित अत्यंत गोपनीय दस्तावेज जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, या कारवाईनंतर भारतातील पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बसीत यांना परराष्ट्र मंत्रालयाने समन्स पाठवले आहे.

मोहम्मद अख्तर (३५) असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. गेल्या काही दिवसांपासून पोलीस या अधिकाऱ्यावर पाळत ठेऊन होते. अटकेनंतर या अधिकाऱ्याला चाणक्यपुरी पोलीस ठाण्यातील कोठडीत ठेवण्यात आले आहे. या कारवाईबाबत गुन्हे शाखेने गृहमंत्री राजनाथ सिंह आणि दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांनाही माहिती दिली आहे. परराष्ट्र मंत्रालयालाही तातडीने अहवाल पाठवण्यात आला आहे.

गुन्हे शाखेच्या गुप्त वार्ता विभागाला या अधिकाऱ्याबाबत माहिती मिळाली होती. पाकिस्तान उच्चायुक्तालयातील एका अधिकाऱ्याकडे भारतीय लष्कराशी संबंधित अत्यंत गोपनीय माहिती असल्याचे गुप्त वार्ता विभागाला कळले होते. त्याआधारे शोध घेऊन मोहम्मद अख्तरला अटक करण्यात आली. हा अधिकारी पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयच्याही संपर्कात होता, असे चौकशीत पुढे आले आहे.

दरम्यान, पाक उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्याची हेरगिरी गांभीर्याने घेण्यात आली असून याबाबत परराष्ट्र मंत्रालयाची तातडीची बैठक होणार आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज