अ‍ॅपशहर

एका दहशतवाद्यावर १ कोटी खर्च करतो पाक

आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर साळसूदपणाचा आव आणून स्वत:वरील दहशतवादाचे आरोप फेटाळणारा पाकिस्तान भारताविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांवर प्रत्येकी एक कोटी रुपये खर्च करत आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील नेते रईस इन्कलाबी यांनी ही पोलखोल केली आहे.

Maharashtra Times 12 Dec 2016, 12:57 pm
मटा ऑनलाइन वृत्त । मुझफ्फराबाद
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pakistan spends one crore for per terrorist
एका दहशतवाद्यावर १ कोटी खर्च करतो पाक


आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर साळसूदपणाचा आव आणून स्वत:वरील दहशतवादाचे आरोप फेटाळणारा पाकिस्तान भारताविरोधी कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांवर प्रत्येकी एक कोटी रुपये खर्च करत आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील नेते रईस इन्कलाबी यांनी ही पोलखोल केली आहे.

रईस इन्कलाबी हे पाकव्याप्त काश्मीरमधील 'जम्मू-काश्मीर अमन फोरम'चे नेते आहेत. पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या लष्कर-ए-तोयबा, लष्कर-ए-झांगवी आणि हिजबुल मुजाहिदीनच्या दहशतवादी तळांना त्यांचा तीव्र विरोध आहे. दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तान सतत दुटप्पी भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 'दहशतवाद्यांना भारताविरोधात तयार करण्याचं काम पाकिस्तान करतो. भारत-पाकमधील नियंत्रण रेषा ओलांडण्यासाठी आणि आत्मघाती हल्ले घडवून आणण्यासाठी एका दहशतवाद्याला एक कोटी रुपये दिले जातात. पाकिस्तानच्या या कारवाया दोन्ही देशातील तणावाचं मुख्य कारण आहे. आमचा याला विरोध आहे. तुम्हाला गोळीबाराची आणि युद्धाची एवढी खुमखुमी असेल तर सैन्याला सैन्याशी भिडवा,' असं आव्हानच इन्कलाबी यांनी पाकिस्तानला दिलं आहे.
You're (Pak) hiring murderers; you pay them Rs1cr & turn them into a bomb&make them cross LoC: Sardar Raees Inqlabi,leader of J&K Aman Forum pic.twitter.com/Z692Dk7T9V — ANI (@ANI_news) December 12, 2016 'पाकिस्तानात ज्या दहशतवादी संघटनांवर बंदी आहे. त्यांना पाकव्याप्त काश्मीरमध्ये रान मोकळं करून देण्यात आलं आहे. इथून भारतविरोधी कारवाया करण्याची त्यांना मुभा आहे. हे दुटप्पी धोरण का?,' असा सवाल इन्कलाबी यांनी केला आहे.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज