अ‍ॅपशहर

पाकनं पुन्हा मोडली शस्त्रसंधी; २ नागरिकांचा मृत्यू

गेल्या काही दिवसांपासून नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराकडून सपाटून मार खाऊनही पाकिस्तानच्या खोड्या सुरूच आहेत. जम्मू-काश्मीरमधील आर एस पुरा सेक्टरमध्ये गुरुवारी रात्री पाकिस्तानी रेंजर्सनी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. त्यात दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून चौघे गंभीर जखमी झाले आहेत.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 19 Jan 2018, 1:12 pm
श्रीनगर:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pakistan violates ceasefire in rs pura sector of jammu kashmir
पाकनं पुन्हा मोडली शस्त्रसंधी; २ नागरिकांचा मृत्यू


गेल्या काही दिवसांपासून नियंत्रण रेषेवर भारतीय लष्कराकडून सपाटून मार खाऊनही पाकिस्तानच्या खोड्या सुरूच आहेत. जम्मू-काश्मीरमधील आर एस पुरा सेक्टरमध्ये गुरुवारी रात्री पाकिस्तानी रेंजर्सनी पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करत गोळीबार केला. त्यात दोन भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला असून ८ जण गंभीर जखमी झाले आहेत.

पाकच्या सैन्यानं बुधवारी रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात भारतीय जवान शहीद झाला होता. तसंच, सीमेलगतच्या गावात राहणाऱ्या १९ वर्षांच्या तरुणीचा मृत्यू झाला होता. प्रत्युत्तरादाखल भारतानं केलेल्या कारवाईत तीन पाकिस्तानी सैनिक मारले गेले. त्यामुळं बिथरलेल्या पाकिस्तानी सैन्यानं काल रात्रीपासून पुन्हा एकदा गोळीबार सुरू केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, पाकिस्ताननं भारताच्या ३० ते ४० चौक्यांना लक्ष्य केलं. सकाळपर्यंत हा गोळीबार सुरू होता. भारतानंही त्यास चोख प्रत्युत्तर दिलं.

सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक के. के. शर्मा यांनी गोळीबाराच्या घटनेला दुजोरा दिला आहे. मात्र, 'आम्ही स्वत:हून गोळीबाराला कधीच सुरुवात करत नाही. सीमेपलीकडून गोळी आल्यास, आम्हालाही प्रत्युत्तर देता येते आणि ते आम्ही गोळीनेच देतो,' असं ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज