F-16 fighter jet: जम्मूतील राजौरी भागात पाडले पाकचे विमान
जम्मूतील राजौरी भागात भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हवाई दलाचे एफ-१६ हे लढाऊ विमान पाडल्याची माहिती भारतीय लष्करातील अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे. याबाबत अधिक तपशील मात्र देण्यात आलेला नाही.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम 27 Feb 2019, 8:53 pm
जम्मू :
जम्मूतील राजौरी भागात भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या हवाई दलाचे एफ-१६ हे लढाऊ विमान पाडल्याची माहिती भारतीय लष्करातील अधिकाऱ्याकडून देण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमधील राजौरी सेक्टरमधील झांगर भागात भारतीय हवाई दलाने पाकिस्तानच्या विमानावर कारवाई केली. हे विमान भारतीय हद्दीत घुसले होते, असेही या अधिकाऱ्यान स्पष्ट केले. याबाबत अधिक तपशील मात्र देण्यात आलेला नाही.
दरम्यान, भारतीय लष्कराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकचे विमान भारताने पाडल्याचे वृत्त आज सकाळीच हाती आले होते. हे विमान नेमके कोणत्या भागात पाडण्यात आले, याची माहिती मात्र मिळाली नव्हती.