अ‍ॅपशहर

लुडो खेळताना पाकिस्तानी तरुणी भारतीयाच्या प्रेमात, नेपाळमधून एंट्री; आता प्रेमकहाणीत ट्विस्ट

लुडो खेळता खेळता पाकिस्तानी तरुणी भारतीय तरुणाच्या प्रेमात पडली. दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं. त्यासाठी तरुणीनं सीमा ओलांडून भारत गाठला. नेपाळमार्गे ती भारतात आली. दोघे लग्न करून बंगळुरूत राहू लागले. पण काही महिन्यांतच दोघांच्या प्रेम कहाणीत ट्विस्ट आला.

Authored byकुणाल गवाणकर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 23 Jan 2023, 12:43 pm
लखनऊ: ऑनलाईन गेमिंग ऍप्समुळे अनेकांचं मनोरंजन होतं. कोविड आणि लॉकडाऊन काळात तर अनेकांनी फोनमध्ये गेमिंग ऍप्स डाऊन केलं. त्यात लुडोचा क्रमांक फार वरचा होता. याच लुडोमुळे काहींची मनं जुळली आणि अनेक प्रेमकहाण्या समोर आल्या. अशीच आणखी एक कहाणी पुढे आली आहे. विशेष म्हणजे ही कहाणी भारत आणि पाकिस्तानमधली आहे. सीमा ओलांडून भारतात आलेल्या एका पाकिस्तानी तरुणीची आणि तिला साथ देणाऱ्या भारतीय तरुणाची ही कहाणी आहे.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम ludo couple


लुडो खेळता खेळता एक पाकिस्तानी तरुणी भारतीय तरुणाच्या प्रेमात पडली. मुलगी देशांची सीमा ओलांडून पाकिस्तानातून भारतात पोहोचली. मुलानंदेखील हिंमत दाखवली. त्यानं तरुणीसोबत विवाह केला आणि दोघे बंगळुरूत राहू लागले. मात्र आता दोघांवर वेगळं होण्याची वेळ आली आहे. बोगस कागदपत्रांच्या आधारे घुसखोरी केल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी तरुणीला अटक केली आहे. यामध्ये तरुणीला साथ दिल्याचा ठपका ठेवत तरुणालदेखील बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
तीन दिवस एकीसोबत; तीन दिवस दुसरीसोबत; २ बायकांकडून नवऱ्याची वाटणी; रविवारचं काय? फैसला झाला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ वर्षांचा मुलायम सिंह यादव मूळचा उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे. तो बंगळुरूतील एका खासगी कंपनीत सुरक्षा कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. मुलायम बराच वेळ लुडो खेळायचा. ऍपवर लुडो खेळत असताना मुलायम पाकिस्तानच्या हैदराबादमध्ये वास्तव्यास असलेल्या १९ वर्षीय इकरा जीवानीच्या संपर्कात आला. दोघांमध्ये मैत्री झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं.
नवरा-बायकोचा वाद, घर पेटलं; थंड नाश्ता कारण ठरला; पत्नीनं स्वत:ला संपवलं की वेगळंच घडलं?
मुलायमच्या सांगण्यावरून १९ वर्षांची इकरा सप्टेंबर २०२२ मध्ये नेपाळची राजधानी काठमांडूमार्गे भारतात आली. त्यानंतर मुलायम आणि इकरा बंगळुरूतील बेलंदूरमधील एका कामगार वसाहतीत राहू लागले. मात्र काही दिवसांतच त्यांचं पितळ उघडं पडलं. पोलिसांना इकराबद्दल समजलं आणि त्यांनी दोघांना अटक केली. पोलिसांनी इकराला परदेशी विभागीय नोंदणी कार्यालयाकडे सुपूर्द केलं. तर मुलायमविरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. बोगस दस्तावेज तयार करून त्याआधी घुसखोरी करणं आणि त्या कागजपत्रांच्या आधारे वास्तव्य करण्याचे गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत.
लेखकाबद्दल
कुणाल गवाणकर
महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस.... आणखी वाचा

महत्वाचे लेख