अ‍ॅपशहर

भारतीय जवान म्हणजे गिधाडं!: अब्दुल मक्की

भारताविरोधात छुपं दहशतवादी युद्ध पुकारणारा 'जमात-उद-दवा'चा म्होरक्या दहशतवादी हाफीज सईद याचा मेव्हणा अब्दुल रेहमान मक्की यानं भारतीय जवानांची तुलना गिधाडांशी केली आहे. 'पम्पोरमध्ये आमच्या दोन वाघांनी गिधाडांच्या ताफ्याला घेरलं,' अशी दर्पोक्ती त्यानं केली आहे.

Maharashtra Times 30 Jun 2016, 11:03 am
मटा ऑनलाइन वृत्त । नवी दिल्ली
महाराष्ट्र टाइम्स.कॉम pampore attack indian troops are jackals
भारतीय जवान म्हणजे गिधाडं!: अब्दुल मक्की


भारताविरोधात छुपं दहशतवादी युद्ध पुकारणारा 'जमात-उद-दवा'चा म्होरक्या दहशतवादी हाफीज सईद याचा मेव्हणा अब्दुल रेहमान मक्की यानं भारतीय जवानांची तुलना गिधाडांशी केली आहे. 'पम्पोरमध्ये आमच्या दोन वाघांनी गिधाडांच्या ताफ्याला घेरलं,' अशी दर्पोक्ती त्यानं केली आहे.

जम्मू-काश्मीरमधील पम्पोर येथे शनिवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे आठ जवान शहीद झाले होते, तर दोन दहशतवादी मारले गेले होते. या हल्ल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पाकिस्तानातील गुजरानवाला इथं झालेल्या जमात-उद-दवाच्या सभेत मक्कीनं हे वक्तव्य केलं. 'इंडियन एक्सप्रेस'नं याबाबतचं वृत्त दिलं असून त्या सभेचा एक व्हिडीओसुद्धा फेसबुकवर अपलोड करण्यात आला आहे. त्यात मक्की भारताविरोधात गरळ ओकताना दिसत आहे. तो म्हणतो, 'पम्पोर इथं हल्ला झाला तेव्हा भारतीय मीडिया ओरडत होती, आमचे हिरो प्रशिक्षण संपवून बसनं येत असताना दोन दहशतवाद्यांनी त्यांना घेरलं. पण मी म्हणतो, हिरो नव्हे गिधाडांच्या ताफ्याला दोन वाघांनी घेरलं.'

याच सभेत मक्की यानं पाकिस्तानी जनतेला भारताविरोधातील युद्धात सहभागी होण्याचं आवाहन केलं. हाफीज सईद यानं यावेळी 'शहिदांचा वंशज' असं म्हणून मक्कीचा गौरव केला.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज