अ‍ॅपशहर

लोकसभेत लेटरबॉम्बचे पडसाद; भाजपकडून मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

माजी मुंबई पोलीस आयुक्त आणि आयपीएस अधिकारी परमजीत सिंग यांनी लिहीलेल्या पत्राचे पडसाद लोकसभेच्या अधिवेशनात उमटले. भाजप खासदारांनी राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तर, केंद्राच्या मदतीने राज्य सरकार पाडण्याचे काम भाजप करत असल्याचा आरोप शिवसेना, काँग्रेसने केला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 22 Mar 2021, 2:31 pm
दिल्ली: माजी मुंबई पोलीस आयुक्त परमजीत सिंग यांच्या पत्राचे पडसाद आज लोकसभेतही उमटले. भाजप खासदारांनी आक्रमक भूमिका घेत या प्रकरणी केंद्रीय तपास संस्थांकडून तपास करण्याची मागणी करण्यात आली. त्याशिवाय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम parmbeer-and-deshmukh
लोकसभेत लेटरबॉम्बचे पडसाद; मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी


भाजप खासदारांनी हे प्रकरण अतिशय गंभीर असल्याचे सांगत राज्याचे मुख्यमंत्री या प्रकरणावर मौन बाळगून असल्याचा आरोप केला. तर, शिवसेना आणि काँग्रेसने महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचा हा केंद्र सरकारचा डाव असल्याचे सांगितले.

वाचा: अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही; शरद पवारांची स्पष्टोक्ती

भाजपचे मुंबईतील खासदार मनोज कोटक यांनी हा मुद्दा लोकसभेत शुन्यप्रहारात उपस्थित केला. राज्य सरकार उद्योगपती, व्यापाऱ्यांना धमकावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे राज्यातील लोकांचे मत बनत असल्याचा दावा कोटक यांनी केले. या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणीदेखील त्यांनी केली.

वाचा: Explainer: मनसुख हत्या: ATSचे शिवदीप लांडे यांचं शिवसेना कनेक्शन काय?

भाजप खासदार राकेश सिंग यांनीदेखील राज्य सरकारवर टीका केली. रविवारपर्यंत राष्ट्रवादीचे नेते हे प्रकरण गंभीर असल्याचे म्हणत होते. आता मात्र गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नाही. या प्रकरणाची चौकशी केंद्रीय तपास यंत्रणेकडून करण्यात यावी आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली.

शिवसेना खासदार विनायक राऊचत यांनी भाजपवर निशाणा साधला. मागील १४ महिन्यांच्या प्रयत्नानंतरही भाजपला राज्यातील सरकार पाडता आले नाही. त्यामुळेच आता भाजप केंद्र सरकारच्या मदतीने सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचे राऊत यांनी म्हटले. ज्या पोलीस आयुक्तांच्या पत्रावर एवढी चर्चा सुरू आहे, त्यांच्यावरही अनेक गंभीर आरोप असल्याचे राऊत यांनी सांगितले.

महत्वाचे लेख