अ‍ॅपशहर

फाळणीला नेहरू, पटेल जबाबदार: फारुक अब्दुल्ला

वादग्रस्त वक्तव्ये करून नेहमीच चर्चेत राहणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी देशाच्या फाळणीसंदर्भात विधान करून नव्या वादाला फोडणी दिली आहे.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम 4 Mar 2018, 12:47 pm
जम्मू:
महाराष्ट्र टाइम्स.कॉम abdullah


वादग्रस्त वक्तव्ये करून नेहमीच चर्चेत राहणारे जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे ज्येष्ठ नेते डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी देशाच्या फाळणीसंदर्भात विधान करून नव्या वादाला फोडणी दिली आहे. फाळणीला जिना नाही, तर पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल हे जबाबदार आहेत, असं ते म्हणाले. ते जम्मूमध्ये बोलत होते.

जिना यांना पाकिस्तानची निर्मिती करायची नव्हती. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर वेगळ्या मुस्लिम राष्ट्राच्या निर्मितीचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावेळी एका आयोगाची स्थापना करण्यात आली. फाळणी करण्याऐवजी अल्पसंख्याकांना विशेषाधिकार देण्याची शिफारस आयोगाने केली होती. जिनांना ते मान्य होतं, पण जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद आणि सरदार पटेल यांनी मान्य केलं नाही. त्यामुळं जिनांनी पुन्हा पाकिस्तानची मागणी केली. त्यावेळी आयोगाच्या शिफारशी मान्य केल्या असत्या तर, बांगलादेश आणि पाकिस्तानची निर्मिती झाली नसती. भारत अखंड राहिला असता, असंही ते म्हणाले.

महत्वाचे लेख

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Times फेसबुकपेज