अ‍ॅपशहर

विमानतळावर तरुणाची चेकिंग केली पण काही सापडलं नाही, अखेर अंडरवेअरमध्ये तपासलं असता पोलीस चक्रावले

Singapore News Today: सिंगापूरहून त्रिचीला जाणाऱ्या एका तस्कराला कस्टम्सने विमानतळावरून अटक केली असून, त्याने त्याच्या अंतर्वस्त्रात असं काही लपवलं होतं की वाचून तुम्हीही हादराल.. खरंतर, सीमाशुल्क विभागाला तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Edited byरेणुका धायबर | महाराष्ट्र टाइम्स.कॉम 3 Oct 2022, 11:12 am
तमिळनाडू : तमिळनाडूतील त्रिची विमानतळावरील सीमाशुल्क विभागाने सिंगापूरहून भारतात सोन्याची तस्करी करणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. संबंधित व्यक्तीने सोनं इतक्या हुशारीने लपवून ठेवलं होतं की ते पकडणं कठीण होतं. मात्र, तरीही कस्टम विभागाने त्याला पकडले. खरंतर, या व्यक्तीने अंडरवेअरमध्ये पेस्ट बनवून त्यामध्ये सोने लपवले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉम customs latest news


मिळालेल्या माहितीनुसार, ही व्यक्ती सिंगापूरहून त्रिचीला आली होती. मात्र, कस्टम विभागाने त्याला चेकिंग दरम्यान पकडले. त्याच्याकडून २४ कॅरेट ३०१ ग्रॅम सोन्याची पेस्ट सापडली असून, त्याची किंमत १५.३१ लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या माणसाने ते आपल्या अंडरवेअरमध्ये लपवले होते. सीमाशुल्क विभागाला सोन्याची तस्करी होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

पुण्याहून कोकण फिरण्यासाठी गेलेल्या तरुणासोबत घडलं भयंकर, मित्रांच्या डोळ्यांदेखत झाला गायब...
आश्चर्याची बाब म्हणजे व्यक्ती जेव्हा सिंगापूरहून त्रिचीला पोहोचला. या दरम्यानच्या काळात तो तपासात कुठेही पकडला गेला नाही. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याची त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती आहे. यापूर्वी पश्चिम बंगालमधील कोलकाता येथूनही सोन्याच्या तस्करीचे असेच प्रकरण समोर आले होते. कोलकाता विमानतळावर एका सुदानी महिलेच्या प्रायव्हेट पार्ट्स आणि अंडरवेअरमधून सुमारे २ किलो सोने जप्त करण्यात आले आहे. परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी सुरू असताना कस्टम अधिकाऱ्यांना या महिलेकडे सोने असल्याची माहिती मिळाली. महिलेच्या अंतर्वस्त्रातून एकूण १,९३० ग्रॅम सोने सापडले. ज्याची बाजारात किंमत सुमारे ९६ लाख १२ हजार ४४६ रुपये असल्याचे सांगण्यात आले.
लेखकाबद्दल
रेणुका धायबर
रेणुका धायबर, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. डिजिटल पत्रकारितेचा आठ वर्षांचा अनुभव आहे. २०१४ पासून पत्रकारीतेत आहेत. झी २४ तास , न्यूज १८ लोकमत, टीव्ही ९ अशा वेबसाइटसाठी त्यांनी काम केले आहे. महाराष्ट्र, राजकारण, गुन्हेगारी, देश, विदेश, स्पेशल बातम्या यासोबत व्यवसाय विषयात त्यांची आवड आहे.... आणखी वाचा

महत्वाचे लेख